"पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन म्हणून शितल तंबोली यांची निवड"
पंढरपूर ( प्रतिनिधी) दि पंढरपूर मर्चंट बँक पंढरपूर या बँकेचे नूतन चेअरमन म्हणून शितल तंबोली यांची निवड सर्वानुमते करण्यात आली तसेच व्हाईस चेअरमन म्हणून वसंत शिखरे यांची निवड करण्यात आली...
पंढरपूर मर्चंट बँकेच्या चेअरमन पदाची निवड पंढरपूर येथील प्रधान शाखा येथील देशभक्त बाबुराव म्हमाने हॉल या ठिकाणी माजी चेअरमन सोमनाथ डोंबे व माजी चेअरमन नागेश अण्णा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बँकेचे सर्व संचालक मंडळ व तसेच सभासद कर्मचारी यांच्या उपस्थित चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बँकेचे संचालक सुधीर भोसले,भारत भिंगे, विजयकुमार परदेशी, आदित्य फतेपुरकर, अमरजीत पाटील, संजय जवंजाळ, नागेश अण्णासाहेब भोसले, सोमनाथ डोंबे, पांडुरंग शिंदे,सौ.गांधी, देशमुख,श्याम गोगाव राजेश धोकटे सर,सुनील मोहिते आधी संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा