"आज पासून पंढरपूर शहराला दररोज पाणीपुरवठा होणार" मुख्याधिकारी पंढरपूर
पंढरपूर ( प्रतिनिधी) गेल्या कित्येक महिन्यापासून पंढरपूर शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा हा सुरू होता. उजनी धरणामध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे एक दिवस आड पाणीपुरवठा पंढरपूर शहराला होत होता. परंतु उजनी धरणामध्ये पाण्याची क्षमता हळूहळू वाढू लागल्यामुळे आणि त्याचप्रमाणे सालाबाद प्रमाणे आषाढी यात्रा पंढरपूर शहरामध्ये भरत असल्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक भक्त येत असतात. या भावीक भक्तांची व स्थानिक नागरिकांची पाण्या वाचून अडचण होऊ नये. म्हणून पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी यांनी पंढरपूर शहराला दिनांक 10 जुलै 2024 पासून पंढरपूर शहराला नियमितपणे दररोज पाणीपुरवठा हा केला जाणार आहे. असे त्यांनी आज रोजी सांगितले.
पंढरपूर शहरातील नागरिकांनी व भावीक भक्तांनी पाण्याचा योग्य तो वापर करावा. व पाणी जपून वापरावे. असे आवाहन त्यांनी पंढरपूर रहिवासी व भावीक भक्तांना केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा