"लाडकी आज्जी " ही योजना शासनाने सुरू करावी" असंख्य महिलांची मागणी.
पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी घोषणा केली. या घोषणेसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
राज्यातील महिला या स्वावलंबी व आर्थिक निर्भर व्हाव्यात म्हणून वय वर्ष 20 ते 65 वय वर्षाच्या महिला भगिनींना बाराशे रुपये ते पंधराशे रुपयेची मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे नियोजन केलेले आहे. या लाडकी बहीण योजनेला संपूर्ण महाराष्ट्र मधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वत्र लाडकी बहीण या योजनेची चर्चा दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील काही महिला या वय वर्ष 65 च्या वरील आहेत. अशा कित्येक महिला महाराष्ट्र मध्ये असल्यामुळे या महिला भगिनी या लाडकी बहीण योजनेपासून त्या वंचित राहत आहेत. अशी चर्चा वय वर्ष 65 वर्षांवरील महिलांमधून ऐकण्यास मिळत आहे. 65 वर्षावरील महिलांना देखील महाराष्ट्र शासनाने बाराशे ते पंधराशे रुपये चे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात याव्यात. अशी मागणी या महिलांकडून सध्या होत आहे.
या 65 वर्षावरील महिलांच्यासाठी "लाडकी आजी" ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू करण्यात यावी. अशी मागणी या वयोवृद्ध महिलांच्या कडून होत असताना आज सर्वत्र दिसत आहे.
तरी महाराष्ट्र राज्य शासनाने 65 वर्षांवरील जेष्ठ महिलांना लाडकी आजी या सदराखाली योजना अमलात आणली जावी. अशी अपेक्षा असंख्य माता-भगिनी या करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा