"मराठा भवन" चे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते होणार" ..... महेश नाना साठे.
पंढरपूर ( प्रतिनिधी) गेल्या कित्येक वर्षापासून चर्चित असलेले आणि मराठा बांधवांना अपेक्षित असणारे मराठा भवन ही पंढरपूर येथील मध्यवर्ती परिसरामधील असलेल्या जागेमध्ये भूमी पूजनाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभहस्ते व अन्य मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश नाना साठे यांनी आज सकल मराठा बांधवांच्या विचार विनिमय बैठकीमध्ये त्यांनी सांगितले.
पंढरपूर शहरांमधील गजानन महाराज मठ यांच्या पिछाडीस असलेली एक एकर अशा जागेमध्ये मराठा बांधवांना अपेक्षित असलेले मराठा भवन या भवनांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा येत्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिनांक 17 जुलै 2024 रोजी होणार आहे. या कार्यक्रमास पंढरपूर तालुक्यातील व पंढरपूर शहरातील मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले.
या मराठा भवन मध्ये छत्रपती शाहू महाराजांना अपेक्षित असलेले सर्वधर्म समावेशक असलेले व पुरोगामी विचाराची भावी पिढी निर्माण करण्याच्या उद्देशाने व सकल मराठा बांधवाला एकजुटीने राहण्याच्या अपेक्षेने हे मराठा भवन उभे राहत आहे. या मराठा भवनांमध्ये प्रशस्त असे अभ्यासिका असणार आहे. या अभ्यासिका मध्ये पंढरपूर शहर व तालुक्यामधील अभ्यासू विद्यार्थ्यांना उच्च पदस्थ असलेले एमपीएससी, यूपीएससी या परीक्षेच्या तयारी करण्याच्या उद्देशाने व आवश्यक असलेले ग्रंथालय अभ्यासिका ही या ठिकाणी असणार आहे. याचा लाभ मराठा बांधवांना व तसेच भगिनींना होणार आहे. पंढरपूर शहरांमध्ये मध्यवर्ती असलेले हे ठिकाण सर्वच बांधवांना अतिशय जवळचे असे असणार आहे. या मराठा भवन उभारणीसाठी महाराष्ट्र शासनाने ही नियोजित जागा दिलेली असून या मराठा भवन उभारणीसाठी पाच कोटी रुपये चा निधीदेखील मंजूर केलेला आहे. आणि या मराठा भवनाच्या पुढील बांधकामासाठी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी देखील अपेक्षित आहे. या वाढीव निधीची देखील मागणी या कार्यक्रम पासून प्रसंगी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे शिंदे गटाचे नेते महेश नाना साठे यांनी दिली.
मराठा सकल समाजाच्या व या बैठकीस उपस्थित माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले, संभाजी ब्रिगेडचे दीपक दादा वाडदेकर, मराठा समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते सुनील पाटील, मराठा सकल समाजाचे अध्यक्ष किरण आप्पा भोसले ,अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, शिवसेना ठाकरे गट शहराध्यक्ष तानाजी मोरे,पै. माऊली काळे, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर आबा भोसले पंढरपूर मर्चंट बँकेचे संचालक व संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ नेते अमरजीत पाटील असे असंख्य कार्यकर्ते व मराठा समाजातील जेष्ठ त्याचप्रमाणे तरुण हे या बैठकीस उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा