"महाराष्ट्रात प्रथमच मराठा भवन पंढरपूर शहरात होत आहे याचे स्वागत सर्व समाज बांधवांनी करायला हवे".. किरण आप्पा भोसले


 पंढरपूर ( प्रतिनिधी) मराठा सकल बांधवांची खूप वर्षापूर्वीची मागणी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्याकडे सकल मराठा समाजातील बांधवांनी सातत्याने केल्यामुळे आज आमच्या या मागणीला यश मिळालेले आहे. महाराष्ट्रात प्रथमच मराठा भवन हे पंढरपूर शहरात होत आहे. ही बाब आपल्या पंढरपूर वाशी तसेच सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधवांना आनंददायी अशी बाब आहे. असे मनोगत सकल मराठा समाजाचे पंढरपूर शहर अध्यक्ष किरण आप्पा भोसले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले. 

      छत्रपती शाहू महाराजांना अपेक्षित असलेले सर्वधर्मसमभाव व सर्व जाती धर्मातील विद्यार्थी विद्यार्थिनींना उच्चपदस्थ नोकरीमध्ये संधी मिळवण्याच्या उद्देशाने एमपीएससी, यूपीएससीच्या या परीक्षेची पूर्वतयारी करण्याच्या साठी अभ्यासिकेची गरज आहे. ही अभ्यासिका व ग्रंथालय या मराठा भवन या इमारतीमध्ये उपलब्ध होणार आहे. याचा लाभ पंढरपूर तालुक्यातील व शहरातील ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवरील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही अभ्यासिका लाभदायक ठरणार आहे. 

       तसेच पंढरपूर शहर व तालुक्यातील मराठा बांधव हा पूर्वी देखील एकजूट होता व आज देखील एकजूट आहे व एकजूट राहणार आहे. आम्हा मराठा बांधवांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. काही मराठा बांधवांच्या मागण्या या वेगवेगळ्या आहेत त्या मागण्या देखील आम्ही शासन दरबारी मांडून त्या पूर्ण करण्याच्या प्रयत्न करणार आहोत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे पंढरपूर येथे येणार असून मराठा भवन या वास्तूच्या उभारणीसाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम त्यांच्या शुभहस्ते होणार आहे. पंढरपूर शहर व पंढरपूर तालुक्यातील सर्व मराठा बांधव या दिवशी या मराठा भवनाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहणार आहे. अशी माहिती सकल मराठा समाजाचे पंढरपूर शहर अध्यक्ष किरण आप्पा भोसले यांनी आज रोजी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

   या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश नाना साठे, संभाजी ब्रिगेडचे दीपक दादा वाडदेकर, माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले, मनसेचे पंढरपूर शहर अध्यक्ष संतोष कवडे, मराठा समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते दत्ता काळे असे असंख्य कार्यकर्ते या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....