"पंढरी नगरीत स्वच्छतेचे काम युद्ध पातळीवर सुरू "


 पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये नेहमीप्रमाणे आषाढी यात्रा लाखोच्या संख्येने भरली यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये 15 ते 16 लाख भाविकांनी पंढरी नगरी मध्ये येऊन विठुरायाचे दर्शन घेतले. 

   आषाढी यात्रा एकादशीच्या आधी आणि नंतर शहर स्वच्छता करण्याचा सूचना जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या होत्या त्यानुसार गुरुवारपासून पुढील दोन दिवसात संपूर्ण शहरभरामध्ये स्वच्छता करण्यात येणार आहे ‌. या स्वच्छतेच्या कामासाठी एकूण 1500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असून युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेतलेली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली. 

     यात्रा कालावधीमध्ये भाविकांची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे प्रदर्शना मार्ग इतर ठिकाणी कचरा गोळा करणारी गाडी ही पोहोचू शकत नव्हती त्यामुळे मठामधून साचलेला कचरा व प्रदक्षिणामारावर मार्गावर साचलेला कचरा गोळा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या परंतु गर्दी कमी होताच एकादशीच्या रात्रीपासूनच 24 तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतलेले आहे यासाठी संपूर्ण शहरा बरोबरच वासटेकर नदीपात्र वाळवंट प्रदर्शना मार्गदर्शन बारीक गोपाळपूर रोड मंदिर परिसर आधीच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी  स्वच्छता कर्मचारी संपूर्ण शहर स्वच्छ करीत असल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे. 

     पंढरपूर शहरातील महत्वाच्या ठिकाणी व प्रदक्षिणा मार्गावर पत्रा शेड मंदिर परिसर प्रदर्शना मार्ग या भागामध्ये जंतुनाशक फवारणी ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. कचरा गोळा करण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने 41 घंटागाडी द्वारे कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालू आहे. कचरा गोळा करण्यासाठी आरोग्य विभागाकडून 6 टिप्पर तीन कॉम्पॅक्टर 6 डंपिंग ट्रॉलीने व जेसीबीच्या साह्याने दररोज शंभर ते 125 टन कचरा उचलण्यात येत आहे. नगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छतेचे काम करीत असताना स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आपले आरोग्य सुव्यवस्थेत राहण्यासाठी नगरपालिकेस सहकार्य करावे असे आव्हान मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी यावेळी केले. 

    पंढरपूर शहर स्वच्छ राहावे म्हणून नगरपरिषदेचे प्रशासक सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी प्रशांत जाधव खूप मुख्याधिकारी सुनील वाळस्कर आरोग्य अधिकारी शरद वाघमारे नागनाथ तोडकर अनिल अभंगराव सर्व विभाग प्रमुख कर्मचारी हे प्रयत्नशील आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....