"स्वच्छ वारी निर्मल वारी सारखी उपक्रम अतिशय उपयुक्त".... मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे
पंढरपूर ( प्रतिनिधी) स्वच्छते विषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये जनजागृती होणे अतिशय गरजेचे व महत्त्वाचे आहे.या स्वच्छतेबरोबरच वारकरी भाविक भक्तांची सुरक्षितता ही देखील महत्त्वाची आहे. स्वच्छ वारी निर्मल वारीच्या सोबत सुरक्षित वारी ही देखील गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सर्वसामान्य वारकरी बांधवांची सुरक्षितता त्याचप्रमाणे स्वच्छता आरोग्य या गोष्टी अतिशय महत्त्वाचे आहेत. असे मनोगत पंचायत समिती आयोजित स्वच्छ वारी निर्मल वारी या कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी व्यक्त केले.
नुकतेच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना या योजनेची माहिती सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी त्याचप्रमाणे महिलांना ही योजना आपल्यासाठी आहे. हे समजण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम हे केले जावेत. संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारची जनजागृती केल्यामुळे सर्वसामान्य महिलांना मदत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जनजागृती करणाऱ्या या पथकाचे कौतुक केले. असे कार्यक्रम महाराष्ट्रभर व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वच्छतेच्या बरोबरच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे हे गरजेचे आहे. सध्याच्या काळामध्ये पर्यावरणाचे समतोल हा ढासळत आहे. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण संपूर्ण देशभर हे वाढलेले आहे. यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षांची लागवड केली गेली पाहिजे आणि बांबू ची लागवड केल्यास जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजनचे निर्मिती होत असते. त्यामुळे बांबू लागवडीला देखील लोकांनी प्राधान्य द्यावे. असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज रोजी केले.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषद च्या वतीने ग्रामविकास विभागाने स्वच्छ वारी निर्मल वारी पार्श्वभूमीवर वारी महाराष्ट्र धर्म या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ग्राम स्वच्छता विभागाच्या लोगोचे अनावरण ही झाले. एक लाख वृक्ष लागवडीचे धोरण राबवले जाणार आहे. या माध्यमातून अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना राज्यभर राबविली जाणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिली.
या समारोप कार्यक्रमास उपस्थित मान्यवर महाराष्ट्रा चे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ओव्हाळ त्याचप्रमाणे कृषी भूषण गोविंदराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा