"आषाढी यात्रेमध्ये महा आरोग्य सेवा आजपासून सुरू"

 

पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे यंदाच्या वर्षी आषाढी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आणि डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शना खाली पंढरपूर येथे वारकरी भाविक भक्तांच्या साठी महाआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 
    आरोग्याची वारी पंढरीच्या द्वारी या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी गेली दोन वर्ष वारकरी भाविक भक्तांच्या आरोग्याची जपणूक करण्याचा उद्देशाने व वारकरी भाविक  पायी चालत येत असताना कोणाला जखम झाली असेल कुणाला सर्दी पडसे व अन्य आजार असतील अशा वारकरी भाविक भक्तांच्या साठी औषध उपचाराची सोय या महाआरोग्य शिबिराच्या मधून करण्यात येणार आहे. 
     या महा आरोग्य सेवा मधून हजारोच्या संख्येने वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी आशा वर्कर्स व अन्य वैद्यकीय सेवाधारी लोकांचा सहभाग या महा आरोग्य सेवेमध्ये असणार आहे. वारकरी भाविक भक्तांसाठी विविध रोगांच्या वरील उपचार यंत्रणा व औषधे ही उपलब्ध असणार आहेत. व वारकऱ्यांच्या साठी ही मोफत आरोग्य सेवा असणार आहे. असे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी सांगितले. 
     दिनांक 15 जुलै 2024 पासून ते 18 जुलै 2024 पर्यंत ही महाआरोग्यसेवेची सेवा वारकरी भाविक भक्तांच्या साठी मोफत दिली जाणार आहे. आरोग्य सेवा केंद्र पंढरपूर शहराच्या लगत वाखरी येथे ही सुविधा उपलब्ध आहे. तसेच गोपाळपूर येथे महा आरोग्य सेवा उपलब्ध आहे. चंद्रभागेच्या तिरी असलेले 65 एकर या परिसरामध्ये आरोग्य सेवा वारकऱ्यांच्या साठी उपलब्ध आहे. तीन रस्ता या परिसरामध्ये देखील आरोग्य सेवेची केंद्र उभारण्यात आलेले आहे. या महाआरोग्य सेवेमधून वारकऱ्यांच्या साठी मोफत औषधोपचार व ऑपरेशन  केले जाणार आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज रोजी दिली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....