महाआरोग्य शिबिर तयारीची पहाणी डॉ तानाजीराव सावंत यांनी केली.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आळंदी ते पंढरपूर पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने व वारकरी भक्तांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने आरोग्य शिबिर हे आयोजित केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने डॉ. तानाजीराव सावंत आरोग्य मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले आरोग्य शिबिर याची  तयारी पंढरपूर येथे सुरू असून पालखीतळ वाखरी याठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले असून त्याचप्रमाणे चंद्रभागेच्या तिरी असलेले 65 एकर या परिसरामध्ये महा आरोग्य शिबिराचे येथेही आयोजन केलेले आहे. तीन रस्ता या ठिकाणी या ठिकाणी देखील आरोग्य शिबिराचे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे गोपाळपूर येथे देखील महाआरोग्य शिबिराच्या वतीने वारकरी भाविक भक्तांना औषध उपचार व अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास साठी संपूर्णता जय्यत तयारी झालेली आहे. याची पाहणी करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज रोजी भेट दिली. 
     गेल्या दोन वर्षापासून महाआरोग्य शिबिर पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित केले जाते. या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा ही केली जाते. वारकऱ्यांचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. आज पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी या विविध ठिकाणी उपक्रम राबवला जात असलेल्या आरोग्य शिबिराची पाहणी करून वारकरी भक्तांना आरोग्य विषयी सुविधा ही उपलब्ध करून देण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या डॉ. तानाजीराव सावंत यांच्या सोबत प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे देखील उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....