"आरोग्याची वारी या संकल्पनेला लाखोच्या संख्येने वारकरी संप्रदायाने दिला प्रतिसाद"


 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी पंढरपूर या तीर्थक्षेत्री आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांच्या या आरोग्याची जपणूक करण्याच्या उद्देशाने डॉ. तानाजीराव सावंत यांनी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही संकल्पना गेल्या दोन वर्षापासून प्रत्यक्षात राबवण्यात आल्यामुळे या आरोग्य वारीला वारकरी संप्रदाय व भाविक भक्तांमधून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देण्यात आलेला आहे या आरोग्य वारीचा लाभ समस्त वारकरी बांधवांनी भावीक भक्ताने घेतलेला आहे. 

     संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत चालत येणाऱ्या असंख्य दिंड्या त्याचप्रमाणे लाखोच्या संख्येने वारकरी  भक्त हे पायी चालत येत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या योजनेच्या अंतर्गत असंख्य भावीक भक्तांच्या आरोग्याची जपणूक केली जात आहे. या आरोग्य वारीमध्ये असंख्य ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वारकरी भक्तांना औषध उपचार हे केले जात आहेत. हजारोच्या संख्येने डॉक्टर्स व वैद्यकीय सहाय्यक हे सहकार्य करीत असून 12 जुलै पर्यंत च्या तारखेपर्यंत सहा लाख वारकरी बांधवाने आरोग्याची सेवा घेतलेली असून लाखोच्या संख्येने भावीक भक्त हे या आरोग्य सेवेची स्तुती करीत आहेत. महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगल्या प्रकारे आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून ही भाविक भक्तांना सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल ते आभार मानीत आहेत. 

    आषाढी यात्रेनिमित्त चालत येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्यसेवा प्रत्येक पाच किलोमीटरच्या अंतरावर ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 6000 आरोग्य अधिकारी व कर्मचारी वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवत आहेत. पालखी आणि दिंडी मुक्कामी असणाऱ्या पाच खाटांचे तात्पुरते आयसीयू तयार केलेले आहेत. येथे ऑक्सिजन मॉनिटर औषध उपचार यांच्यासह तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी गतवर्षीपासून राज्य सरकारने आरोग्याची वारी पंढरीच्या द्वारी हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमांतर्गत यंदाही वारकऱ्यांना पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पंढरपूर येथे मोफत आरोग्य शिबाराच्या माध्यमातून आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे 6368 अधिकारी आणि कर्मचारी मनुष्यबळ कार्यरत असणार आहे. त्या अनुषंगाने विभागाकडून दररोज आढावा घेतला जात आहे. या उद्देशाने आषाढी वारीमध्ये डॉक्टर नर्स आरोग्य सहाय्यक अशा वर्कर्स आरोग्य सेवक शिपाई सफाई कामगार असे सर्व कर्मचारी सेवा देत आहेत. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर आपला दवाखाना कार्यरत आहे. यासह ताप सर्दी खोकला डेर्सिंग जुलाब या त्रासचा त्रास होणारा होत असेल तर त्यासाठी ॲम्बुलन्स बाईक त्यांना ठेवण्यात आलेली आहे. फिरत्या ॲम्बुलन्स बरोबरच 102 व 108 ॲम्बुलन्स ही पालखी मार्गावरून सेवा देण्यासाठी कार्यरत आहे. तसेच पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आलेले आहे. याच बरोबर महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय करण्यात आलेली आहे. पालखी सोहळा 2024 साठी एकूण मनुष्यबळ 6368 वारी दरम्यान 102 व 108 रुग्णवाहिका या 707 उपलब्ध आहेत. दिंडी प्रमुखासाठी औषधीकीट 585 महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ञ 136 पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना 136 पालखी मार्गावर आरोग्य दूत 212 पालखीसोबत माहिती शिक्षण व संदेशवहन चित्ररत्थ पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पाच बेडची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष एकूण 87 आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम विविध माध्यमाद्वारे आरोग्य जनजागृती अशा विविध आरोग्यविषयक माहिती व सेवा उपलब्ध करून देण्याचे श्रेय महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांना जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....