"आषाढी यात्रेनिमित्त पंढरी नगरीमध्ये स्वच्छता मोहीम सुरू" मुख्य अधिकारी डॉ. प्रशांत जाधव
पंढरपूर ( प्रतिनिधी) शेकडो वर्षापासून पंढरपूर तीर्थक्षेत्र येथे श्री विठूरायाच्या दर्शनासाठी पूर्ण देशभरामधून वारकरी संप्रदाय हा आषाढी, कार्तिकी, माघी,व चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूर शहरांमध्ये येत आहे. येणाऱ्या आषाढी यात्रा निमित्ताने पंढरपूर शहर व चंद्रभागा नदी आणि वाळवंट परिसर हा स्वच्छ राखला जात आहे. या स्वच्छतेची मोहीम सध्या पंढरपूर शहरांमध्ये सुरू असून आषाढी यात्रा दिनांक 17 जुलै 2024 रोजी भरत असून वारकरी भाविक भक्तांचे आरोग्य व पंढरपूर शहरातील रहिवाशांचे आरोग्य जपण्याचा उद्देशाने पंढरपूर नगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे यात्रेच्या अगोदर स्वच्छता म्हणून ही राबवली जात आहे.
चंद्रभागेचे वाळवंट जुन्या दगडी फुलापासून ते पुंडलिक मंदिर व त्याचा काही पुढील भाग या परिसरामध्ये वारकरी भाविक भक्त हे चंद्रभागेमध्ये स्नान करतात. या नदीचे पावित्र्य राखण्याच्या उद्देशाने संपूर्ण नदी परिसर हा स्वच्छ ठेवला जात आहे. पंढरपूर नगरपरिषद ने एकूण 75 स्वच्छता कर्मचारी या मोहिमेवर नेमलेले असून या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नदी परिसर व सर्व नदीवरील घाट स्वच्छ केले जात आहेत. त्याचप्रमाणे नदीचे पावित्र्य देखील राखले जात आहे. हाय मास्ट या दिव्याची दुरुस्ती यापूर्वीच करण्यात आलेली आहे. वाळवंटालगत असलेल्या घाटावरचे फ्लड लाईट सुद्धा बसवण्याचे काम चालू आहे. तसेच यात्रा कालावधी पूर्ण होईपर्यंत नदीच्या पात्रातील स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न नगरपरिषद करणार आहे. अशी माहिती आज रोजी पंढरपूर नगरपरिषद चे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी आज रोजी पत्रकाराने दिली

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा