"बॅंकरुपी लावलेले रोपटे तोडणाऱ्यांची संख्या जास्त " ह.भ प.गहिनीनाथ महाराज औसेकर.
पंढरपूर ( प्रतिनिधी). एखादा व्यक्ती समूह लहानसे रोपटे लावण्याचा प्रयत्न करतो. कारण लहानशा रोपट्याचे मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर होऊन या झाडाखाली थांबणाऱ्याला सावली लाभणार असते. त्याचप्रमाणे फुले ,फळे लाभणार असते. परंतु अशा लहानशा रोपट्याला तोडण्याचे काम काही विघ्न संतोषी लोक करीत असतात. तसंच सध्याच्या जगामध्ये सर्वत्र स्पर्धा या वाढलेल्या आहेत. बँकिंग क्षेत्रामध्ये देखील स्पर्धा या वाढलेल्या असून अशा या बँक रुपी रोपट्याला तोडण्याचे काम काही मंडळी करीत असतात. परंतु त्या लहानशा रोपट्याची जपणूक करून त्याला वाढवण्याचा प्रयत्न काही लोक करतात. आणि ते झाड मोठे होऊन सर्वांना सावली देऊ लागते. या बँक रुपी रोपट्याला मोठ्या झाडांमध्ये रूपांतर करण्याचे कार्य आजी-माजी संचालक मंडळाने केलेले आहे. त्याचप्रमाणे कर्मचारी यांना देखील याचे श्रेय जाते.अशा प्रकारच्या उदाहरणांमधून ह भ प गहिनीनाथ औसेकर महाराजांनी दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक या बँकेच्या सातव्या नवीन शाखेचे उद्घाटन इसबावी येथे करीत असताना त्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
पंढरपूर मर्चंट बँकेच्या 1961 सालच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या सर्व संचालक मंडळांनी पंढरपूर मर्चंट बँकेच्या प्रगतीस व वाढीस हातभार लावलेला आहे. दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक ही बँक शहरातील व्यापारी, शेतकरी, कष्टकरी,शिक्षक, लघुउद्योग करणारे उद्योजक यांना आर्थिक मदत करण्याचा उद्देशाने व या लोकांचे आर्थिक परिस्थिती बळकट करण्याचा उद्देशाने ही बँक कार्यरत आहे. 11000 च्या संख्येने असलेले सभासद व ठेवीदार यांच्या विश्वासास पात्र ठरलेली ही बँक आहे. माजी चेअरमन नागेश काका भोसले यांनी या बँके ला प्रगती पथावर आणण्याचे कार्य केलेले आहे.
मर्चंट बँकेचे संचालक मंडळ व कर्मचारी हे सभासदांच्या व बँकेच्या ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. पंढरपूर मर्चंट बँकेच्या शाखा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये व्हाव्यात व जिल्ह्याच्या बाहेर देखील पंढरपूर मर्चंट बँकेच्या शाखा या व्हाव्यात अशी शुभेच्छा महाराजांनी आज इसबावी येथील नवीन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
पंढरपूर दर्शन को-ऑपरेटिव बँकेच्या इसबावी येथील सातव्या नवीन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बँकेचे सर्व संचालक मंडळ तसेच माजी संचालक मंडळ सभासद आणि भागातील रहिवासी नागरिक हे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा