"महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणीला दरमहा१२०० ते १५०० रुपये देणार "
पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्र मध्ये सत्ताधारी भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची सत्ता असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या तिन्ही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्र राज्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला मतदारांची संख्या असल्यामुळे या महिला व तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याच्या विचारात आहे.
मध्यप्रदेश शासनाच्या धर्तीवर गरीब महिलांना दरमहा बाराशे ते पंधराशे रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत देण्याचे ठरवल्याचे समजते. महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अमलात आणण्याचे ठरवले असून दारिद्र्यरेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना महिन्याला 1500 ते 1500 रुपये देण्यात येणार असून त्याचप्रमाणे 21 ते 60 वर्ष वयोगटातील दारिद्र्यरेषेखालील महिला बरोबर विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिलांना देखील मदत देण्यात येणार आहे. ही रक्कम प्रत्येक महिन्याला संबंधित महिला लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहेत. या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने मुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर वार्षिक पंधरा ते वीस हजार कोटीचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.
मध्यप्रदेश सरकारने लाडली बहना ही योजना अमलात आणून महिलांच्या खात्यावर रक्कम जमा केल्यामुळे तेथील महिलांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भरभरून मतदान तेथील भाजपा सरकारला केल्याचे दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याची हालचाल सुरू झाल्याचे समजते. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा