"GST चा कर रद्द करण्यात यावा. हा सर्वसामान्य जनतेला जाचक आहे " प्रणिती ताई शिंदे.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) जीएसटीचा कर हा अतिशय जाचक असून सर्वसामान्य जनतेला त्रासदायक असा कर आहे. या जीएसटी करा ला पंढरपूर शहरातील डॉक्टर, इंजिनिअर्स ,वकील आणि शेतकरी वर्गाने विरोध दर्शवला, असून जीएसटी कर कसा जाचक आहे. याची माहिती व अनुभव हे डॉक्टर्स इंजिनियर्स व शेतकरी वर्गाने प्रणिती ताई शिंदे यांना भेटून त्यांनी आपली जीएसटी या करा बाबतची तक्रार ऐकवली. 

    त्यावेळी प्रणिती ताई शिंदे यांनी वैद्यकीय उपकरणावर तसेच उपचार यंत्रणेवर या जीएसटी कराचा जाचक असा त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे शेतकरी वर्ग हा खत ,बी ,बियाणे खरेदी करत असतो. या खरेदीवर देखील त्यांना जीएसटी ही भरावी लागते. अशी ही जाचक असलेली जीएसटी कर प्रणाली ही रद्द केली जावी. सर्वसामान्य माणूस हॉटेलमध्ये जेवायला गेला तरी त्याला जेवण्या अगोदर जीएसटी कर भरावा लागतो. अशी परिस्थिती सद्यस्थितीला भारत देशामध्ये आहे. तरी असा हा जाचक असलेला जीएसटी कर शासनाने एक तर कमी करावा. किंवा रद्द करावा. अशी त्यांनी मागणी केली. 

    पंढरपूर शहरातील जोगेश्वरी हॉल येथे आयोजित डॉक्टर्स, वकील आणि शेतकरी वर्ग सर्वसामान्य जनता ही आपली जीएसटी बाबतची तक्रार ऐकवण्यासाठी प्रणिती ताई शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी वरील वक्तव्य केले. डॉक्टर्स व शेतकरी यांची बाजू आपण संसदेत मांडू आणि जीएसटी कर हा कमी किंवा रद्द करण्यासाठी सरकारला भाग पाडू .असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमाला उपस्थित पंढरपूर शहरातील शेतकरी वकील डॉक्टर्स इंजिनियर्स हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....