"नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मतांनी विजयी करणार"...... माजी आमदार राजन पाटील
पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने निवडून देण्याचा निर्धार आम्ही मोहोळ तालुक्यातील सर्वांनी केलेला आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. असे मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी आज रोजी केले.
नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्या बांधवांच्या बँक खाते मध्ये सहा हजार रुपये हे जमा करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला अन्नधान्य मोफत देण्यात येत आहे,आणि जे बेघर लोक आहेत त्यांना घरकुल देण्याची नियोजन या मोदी सरकारने केलेले आहे. देशाच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड करण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आम्ही ठरवले आहे.
मोहोळ तालुक्याला कायमस्वरूपी भेडसावणारा हा पाणी प्रश्न, हा पाणी प्रश्न ४० गावातील असून हा प्रश्न ज्वलंतपणे भासत आहे. या चाळीसगावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते हे संसदेमध्ये जाऊन मोहोळ तालुक्यातील चाळीस गावाचा प्रश्न हे तातडीने सोडवणार आहेत. अशी ग्वाही देखील माजी आमदार राजेंद्र पाटील यांनी आज रोजी दिली..
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते यांनी देशाचे पंतप्रधान मोदी यांना साथ देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि देशातील शेतकरी, बेरोजगार तरुणांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, सर्वसामान्य लोकांचे कल्याण करण्यासाठी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचा आहे.
मोहोळ तालुक्यातील पाणी प्रश्न व बेरोजगारांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या अडीअडचणी या मी सोडवणार आहे. असे आश्वासन राम सातपुते यांनी आज रोजी दिले.
मोहोळ तालुक्यामध्ये विरोधकाचे एकही बुथ कुठे दिसणार नाही. कारण संपूर्ण मतदारसंघांमध्ये भाजपामय वातावरण असल्यामुळे संपूर्ण तालुका हा भाजपाच्या उमेदवाराला निवडून देण्याचाही निर्धार या तालुक्याने केलेला आहे. असे वक्तव्य राजन पाटील यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा