" मोदी सरकारने केलेली विकास कामे व विविध कल्याणकारी योजना ची माहिती घोंगडी बैठकीच्या माध्यमातून"...
पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचार दौरा पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमधून घोंगडी बैठकीचे आयोजन करून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील आमदार समाधान आवताडे आणि प्रशांतराव परिचारक यांनी या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशातील सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, गोरगरीब, त्याचप्रमाणे महिला यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांनी केलेल्या लोक कल्याणकारी योजनेची माहिती जनसामान्यांना व्हावी म्हणून आमदार समाधान आवताडे आणि परिचारक या दोन नेते मंडळींनी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागामधून घोंगडी बैठकीचे आयोजन करून या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारने केलेल्या कार्याची माहिती ते देत आहेत. अशाच घोंगडी बैठकीचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे. ते पुढील गावाप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील गादेगाव, शिरढोण ,कौठाळी , वाखरी या चार गावांमधून दुपारी चार वाजल्यापासून ते सायंकाळच्या सहा वाजून 30 मिनिटापर्यंत या चारी गावांमधून घोंगडी बैठकीचे आयोजन केलेले आहे. असे पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे यांनी ही माहिती दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा