"भाजपाचेे माजी दोन्ही खासदार प्रचारासाठी का फिरत नाहीत.? त्यांना आता लाज वाटते वाटतं"..., प्रणिती ताई शिंदे


 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे दोन्ही माजी खासदार आज प्रचारा मध्ये का दिसत नाही? त्यांना त्यांनी न केलेल्या कामामुळे कदाचित लाज वाटत असेल. असे सोलापूर लोकसभा मतदारसंघात तील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेमध्ये त्यांनी वरील वक्तव्य केले. 

    आज रोजी प्रणिती ताई शिंदे यांनी  सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या वतीने त्याने उमेदवारी अर्ज भरला. यावेळी उपस्थित सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी आमदार त्याचप्रमाणे विविध पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते हे उपस्थित होते. त्यांनी सोलापुरातील काँग्रेस भवन, सात रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मार्गावरून त्यांनी हजारोंच्या संख्येने जमलेल्या समुदायासोबत त्यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज भरला. 

      प्रणिती ताई शिंदे यांनी आपल्या भाषणांमधून त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या आजपर्यंत भाजपाच्या दोन्ही खासदारांनी जनतेच्या हिताचे कोणतेही काम केलेले नाही. यंत्र कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत. की एमआयडीसी चा मोठ्या प्रमाणात विकास करावा .यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पाणी प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. बेरोजगारांच्या  हाताला त्यांनी काम देऊ शकले नाहीत. आणि सोलापूर स्मार्ट सिटी करण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केलेले नाहीत. त्यांच्या नाकरत्या वृत्तीमुळे आज सोलापूर 25 वर्षे मागे पडलेला आहे. 

     समोर जमलेला हा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनता जनार्दन,शेतकरी ,कामगार ,तरुण बांधव ही माझी शक्ती असून मला या सर्वांनी लोकसभानिवडणुकीमध्ये लढण्याचे बळ दिलेले आहे. मी शेतकरी कामगार बेरोजगार तरुण आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी, कल्याणसाठी मी आता  काम करणार आहे. त्यासाठी मला हा लोकशाहीचा लढा लढावा लागणार आहे. त्यासाठी मला तुम्ही निवडून द्या. मी एक योद्धा म्हणून आपल्या सर्वसामान्यांच्या बळावर भाजपाचा विरोधात मी लढणार आहे. मला आपली साथ हवी आहे .असे आव्हान त्यांनी आपल्या लोकसभेचा अर्ज भरल्यानंतर  त्यांनी आपल्या सभेमधून सर्वसामान्य जनतेला आव्हान केले. 

     भाजपाचे दोन्ही माजी खासदार हे सत्तेची मजा घेण्यासाठी खासदार  झाले होते. आणि अशीच परंपरा आता देखील भाजपामध्ये दिसून येत आहे. ही प्रवृत्ती रोखण्यासाठी मला आपल्या पाठिंबाची गरज आहे .खंबीर साथीची गरज आहे. सर्वसामान्यांची प्रश्न मी शासन दरबारी मांडण्यासाठी मला एक वेळ संधी द्या. असे त्यांनी आपल्या भाषणामधून मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....