अभिजीत पाटील यांच्या वरील कारवाई म्हणजे भाजपा ची "विनाश काले विपरीत बुद्धी "...
पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतेच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे या कारखान्यावर कर्जफेड न केल्यामुळे उत्पादित साखर गोडाऊनला सील लावण्यात आले. या घटनेमुळे ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी तसेच संचालक मंडळ हे मोठ्या संकटात पडल्याचे सद्यस्थितीला दिसत आहे.
गेली काही वर्ष बंद स्थितीत असलेला हा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा पुन्हा एकदा जोमाने सुरुवात करण्याच्या उद्देशाने अभिजीत पाटील यांनी प्रयत्न केला. व त्या प्रयत्नाला त्यांना यश आले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आपण कसा चांगल्या पद्धतीने हा कारखाना चालवू शकतो. हे आपल्या प्रचारा मध्ये त्यांनी शेतकरी ऊस उत्पादकाला त्यांनी पटवून सांगितले. व कारखाना निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर हा कारखाना गेली दोन वर्ष सुरळीतपणे सुरू करून शेतकऱ्याच्या ऊसाला चांगला दर देण्याचा त्याने प्रयत्न केला असताना थकीत कर्ज पेड न केल्यामुळे आज या कारखान्याला त्याच्या गोडाऊनला सील करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी ऊस उत्पादक, कर्मचारी व संचालक मंडळ ही चिंतेत पडले.
काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या गटामध्ये अभिजीत पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी माढा लोकसभा मतदार संघ आणि सोलापूर लोकसभा मतदार संघामधून भाजपाविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या या श्री विठ्ठल सहकारी कारखान्यावर कारवाई झाली की काय? अशी शंका ऊस उत्पादक सभासद, कर्मचारी व संचालक मंडळ यांच्यामध्ये निर्माण झाली. सत्ताधारी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, व भाजपा सरकारने ही केलेली कारवाई सर्वसामान्य शेतकरी, ऊस उत्पादक व कारखान्यातील कर्मचाऱ्यांना आवडली नाही.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या असताना त्या कर्जाच्या विळ्खातून बाहेर काढण्यासाठी तसेच पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला गाळप करून देण्याच्या उद्देशाने व ऊस दर चांगला देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अभिजीत पाटील यांना अशा कारवाईला सामोरे जावे लागते. याचे आश्चर्य व संताप सर्वसाधारण सभासद कर्मचारी व या कारखान्यावर उपजीविका असणारे असंख्य लोक यांच्या मनामध्ये आज राग उत्पन्न होत आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळीच अशी कारवाई झाल्यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे हजारोंच्या संख्येने असलेले सभासद व या सभासदांचे कुटुंब आज या निर्णयाला मतदानाच्या रूपाने विरोध दर्शवणार हे आज या सभासदांच्या बोलण्यामधून आज ऐकवायला मिळत आहे. सत्ताधारी सरकारने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर केलेली ही कारवाई म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असेच म्हणावे लागेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा