"काॅंग्रेसने गरीबी हटाव ची फक्त घोषणा केली, परंतु मोदी सरकारने गरीबी हटवण्यासाठी प्रयत्न केले आहे."... प्रशांत परिचारक
पंढरपूर ( प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाने गरीबी हटावचा नारा दिला. परंतु गरीबी काय हटवली नाही. परंतु मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये गरिबी हटवण्याचा मोदी सरकारने प्रयत्न केलेला आहे. गोरगरिबांना मोफत घरकुल दिलेले आहेत. त्याचप्रमाणे 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य दिलेले आहे. त्याचप्रमाणे पाच लाख रुपये पर्यंतचा आरोग्य विमा हा मोदी सरकारने दिलेला आहे. महिलांसाठी उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची जपणूक केलेली आहे. अशा विविध योजनेच्या माध्यमातून मोदी सरकारने या गेल्या दहा वर्षांमध्ये गोरगरिबांसाठी फक्त घोषणा केली नाही, तर त्या गरीब लोकांची गरीबी हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे विधान परिषदेचे माजी आमदार भाजपाचे जेष्ठ नेते क्लस्टर हेड प्रशांतराव परिचारक यांनी आज कोर्टी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्या मध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रशांतराव परिचारक पुढे बोलत असताना ते म्हणाले शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव दिलेला आहे. त्याचप्रमाणे ऊसाला पूर्वीपेक्षा दुप्पट म्हणजे पंधराशे रुपये दर पूर्वी मिळत होता. तर आज एकतीसशे,ते तीन हजार रुपये चा दर ऊस उत्पादकांना मिळत आहे. आणि ग्रामीण भागातील गोरगरिबांसाठी जल योजना त्यांनी कार्यान्वित केलेली आहे. ज्या ग्रामीण भागामध्ये काँग्रेस राजवटीमध्ये विजेची सुविधा उपलब्ध नव्हत्या परंतु आज देशांमध्ये सर्वत्र वीज पोचवली गेलेली आहे. हे कार्य मोदी सरकारच्या कालावधीमध्ये झालेले आहे.
जीएसटी करा बाबत विरोधक संभ्रम निर्माण करीत आहे. जीएसटी कर प्रणाली ही काँग्रेसच्या राजवटीमध्येच अमलात आलेली आहे. परंतु या जीएसटीच्या कर च्या माध्यमातून जो पैसा गोळा होत आहे .तो भारतातील सर्व राज्यातील विकास कामासाठी तो पैसा वापरला जात आहे. जीएसटी कर हा सर्वसामान्य नागरिकांवर पडलेला नसून चे कारखानदार आहेत, उद्योगपती आहेत त्यांच्यावर कर लादला आहे.त्याचप्रमाणे जे चैनीच्या वस्तू आहेत म्हणजे गाडी खरेदी मोटर खरेदी, कार खरेदी मोटरसायकल खरेदी ,टीव्ही, फ्रिज खरेदी अशा वस्तूंवर त्यांनी जीएसटी लावलेली आहे. गोरगरिबांच्या वर जीएसटी ही लावली गेलेली नाही परंतु विरोधक हे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते तसेच पांडुरंग परिवार या परिवारातील कार्यकर्त्यांनी मोदी शासनाने ज्या काही गोरगरिबांसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे. त्या सुविधा या जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत. त्या या ज्या सुविधा आहेत. त्या मोदी सरकारने दिलेले आहेत. याची आवर्जून त्या सर्वसामान्य मतदारांना माहिती द्यावी. चाळीस कोटी जनतेला मोदी सरकारने घरकुले दिलेले आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये हे दिलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचे सहा हजार रुपये आणि केंद्र शासनाचे 6000 रुपये असे 12 हजार रुपये आज घडीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेन्शन योजनेच्या नावे ही जमा होत आहे. अशी असंख्य विकास कामे ही मोदी सरकारने केलेली आहे. म्हणून मोदी सरकारला निवडलं पाहिजे. असे कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य मतदारांना आवर्जून सांगितले पाहिजे.
लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी मोदी शासनाने जाहीर केलेल्या आणि कार्यान्वित केलेल्या योजना या जनतेपर्यंत पोहोचले आहेत. आणि जनतेला मतदानासाठी बाहेर काढावे. त्यांना मोदी सरकारचा काम आणि त्यांच्या योजना या समजावून सांगाव्यात. असे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी पांडुरंग परिवार या त्यांच्या परिवारांमधून कार्यकर्त्यांना त्यांनी आज कोर्टी येथील महादेवाच्या मंदिरामध्ये मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे त्याचप्रमाणे कोर्टी येथील सरपंच आणि असंख्य मान्यवर कार्यकर्ते हे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा