अभिजीत पाटील यांना भाजपा ने बांधून घेतले............."माढा निवडणूक मध्ये मदत करा आम्ही कारखान्याला मदत करु".... देवेंद्र फडणवीस
पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदारसंघ, आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ या सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागेच्या निवडणुकीमध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना भाजपाने बांधून घेतलेचे दिसून येते.श्री विठ्ठल साखर कारखान्यावरील कारवाई वर मार्ग काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये अभिजीत पाटील यांनी मदत करावी. मग आम्ही श्री विठ्ठल साखर कारखान्याला मदत करू. असे आश्वासन आज रोजी सोलापूर येथे अभिजीत आबा पाटील यांना भेटीचे दरम्यान मध्ये आश्वासन दिल्याचे समजते.
माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधून भाजपच्या विरोधात अभिजीत आबा पाटील यांनी मध्यंतरी माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हावरील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये ते भाग घेत होते. त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचार सभेमध्ये त्यांनी सहभाग आपला नोंदवला होता. हे सर्व पाहता भाजपा सारख्या पक्षाला माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधून भाजपच्या उमेदवाराला फटका बसतो की काय? असे वाटल्यामुळेच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे की काय? अशी शंका आता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचारी या सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.
सर्वसामान्य श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद, कर्मचारी तसेच व्यापारी या सर्वांशी जनसंवाद साधला असता त्यांच्या बोलण्यामधून त्यांचे स्पष्ट मत ते व्यक्त करीत होते." जरी अभिजीत आबा पाटील हे भाजपात गेले, त्यांच्या प्रचार सभांमध्ये सामील झाले तरी आम्ही भाजपाचा प्रचार करणार नाही. आम्ही आमचे मत हे निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच व्यक्त करू" असे या सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कर्मचारी व्यापारी यांच्याशी संवाद साधला असता कळून आले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर झालेली ही कारवाई ही कोणत्या कारणाने झाली आहे? याचे रहस्य सर्वसामान्य जनतेला, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळून चुकले आहे. पाहूया येत्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्य शेतकरी व जनतेच्या मनामध्ये काय शिजत होते ते कळून येईल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा