"मोदी को जब डर लगता है,तब झुठ बोलता है" ... राहुल गांधी. राहुल गांधी यांच्या सभेला लाखोच्या संख्येने गर्दी...
पंढरपूर ( प्रतिनिधी) मोदी को जब भी डर लगता है तब मोदी झूट बोलना शुरु करता है... असे काँग्रेसची युवा नेते राहुल गांधी यांनी आज सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत असताना त्यांनी वरील वक्तव्य केले.
पंतप्रधान मोदी यांना ज्या ज्या वेळी विरोधकांनी संसदेमध्ये विविध प्रश्नावर घेरले असता ते नेहमी खोटे बोलतात. पाकिस्तान,चीन या देशा वर टीका करत जनतेचे लक्ष ते दुसरीकडे वळवतात. मोदी यांच्या राजवटीमध्ये महागाई ही वाढलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला ते योग्य दर देऊ शकले नाहीत. सर्वसामान्य बेरोजगार तरुणांना दोन कोटी रोजगार दरवर्षी देतो म्हणाले परंतु त्यांनी या बेरोजगार तरुणांना रोजगार दिला नाही. त्यांनी हा रोजगार उद्योगपतींना दिला. आणि त्यांना अरबोपती करून टाकले. असा आरोप देखील त्यांनी या सभेच्या दरम्यान मध्ये केला.
मोदी सरकारने देशभरातील नाममात्र 20 उद्योगपतींनाच अब्जोपती केले. देशाच्या 70 ते 80 कोटी जनतेच्या संपत्ती एकीकडे आणि या वीस लोकांची संपत्ती बरोबरीची आहे. एवढा फरक हा सर्वसामान्य जनता आणि या 20 कोटी उद्योगपतींच्या मध्ये आपल्याला जो दिसून येतो. तो या मोदी सरकारने केलेला आहे. मोदी सरकारने आदानी, अंबानी सारख्या उद्योगपतींना प्रचंड मोठे केले.
देशाचे संविधान हे बदलू पाहणारे भाजपा सरकार आहे. सर्वसामान्य जनतेने त्याला विरोध दर्शवला पाहिजे. अन्यथा आपल्याला त्याची वाईट फळे भोगावे लागतील.
या 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस तसेच त्यांच्या सोबत असलेले इंडिया गटबंधन या आघाडीला निवडून दिल्यास सर्वसामान्य भारत देशातील महिलांच्या बँक खाते मध्ये एक वर्षांमध्ये एक लाख रुपये जमा झालेले असतील. दरमहा साडेआठ हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये न चुकता हे भरले जातील. महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. परंतु या महिलेला आर्थिक बाबतीत सबला करण्यासाठी ही योजना आम्ही राबवणार आहोत. त्याचप्रमाणे शेतकरी बांधव या शेतकरी बांधवाला कर्जमुक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्याचे आमचे अभिवचन आहे. देशांमधील सुशिक्षित पदवीधर तरुणांना त्यांच्या त्यांच्या हाताला काम मिळवून देणार आहोत. त्यांना 35 वर्ष त्यांना काम देण्याचे आम्ही नियोजन केलेले आहे. या कामाच्या माध्यमातून त्यांना दरमहा आठ हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत.
मोदी हे स्वतःला ओबीसी म्हणून घेतात, आणि जातीनिहाय जन गणना ही केली जावी म्हणून काँग्रेसची मागणी आहे. परंतु या जातगणनेला ते घाबरतात. जात गणना करा म्हटल्यानंतर मोदी म्हणतात, भारत देशामध्ये दोन जाती आहेत, एक श्रीमंत आणि एक गरीब अशा दोन जाती आहेत. असे ते म्हणतात आणि स्वतःला अडचणीच्या वेळी मी ओबीसी आहे. म्हणून सांगतात असे धोरण असलेले हे मोदी पावलोपावली जनतेशी ते खोटे बोलतात.
इलेक्ट्रॉल बाॅंड म्हणजे निवडणूक निधी हा निधी भारत देशातील उद्योगपती व अन्य लोक हा निधी जमा करतात. या इलेक्ट्रॉनिक मधून सर्वात जास्त निधी हा भाजपाला मिळालेला आहे. सुप्रीम कोर्ट यांनी हा जो निवडणूक निधी ज्या ज्या लोकांनी दिलेला आहे. त्यांची नावे जाहीर करा असे म्हणताच मोदी शासन या निधी देणाऱ्या लोकांचे नाव जाहीर करू शकत नाहीत . बँकेकडे विचारणा केली असता, बँकेने देखील ही नावे जाहीर करण्यास नकार दिला आहे. असा हा इलेक्ट्रॉल बॉण्ड निधी गोळा केला जात आहे. हे सर्व मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळ्याचे चिन्ह आहेत. असे देखील आपल्या त्यांनी प्रचार सभेच्या भाषणामध्ये व्यक्त केले.
प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचार सभेसाठी आणि राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखोच्या संख्येने आज गर्दी जमली होती. यावेळी उपस्थित काँग्रेस व गटबंधन मधील विविध पक्षाचे सहकारी सहयोगी पक्ष नेते मंडळी कार्यकर्ते हे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा