"३१ गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराला जनता निवडून देते की माझ्या सारख्या प्रामाणिक, सुशिक्षित उमेदवाराला निवडून देते हे पहायचे आहे." लक्ष्मण हाके.
पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदार संघातील सर्वसामान्य मतदार या येत्या लोकसभेच्या निवडणुकीला 31 गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराला जनता निवडून देते, की माझ्यासारख्या प्रामाणिक सुशिक्षित उमेदवाराला निवडून देते हे पाहायचे आहे. असे बहुजन पार्टीचे उमेदवार लक्ष्मण हाके यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आपले मत व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला उपस्थित एडवोकेट प्रशांत रुपनवर, बाबा चव्हाण, त्याचप्रमाणे सतीश कुलाल आणि सचिन बंडगर असे मान्यवर उपस्थित होते.
आपल्या पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलत असताना लक्ष्मण हाके हे म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता ही एकूण मतदार संख्ये पैकी 13 लाख मतदार हे ओबीसीचे आहेत. आणि या एवढ्या मोठ्या ओबीसी मतदार या मतदारसंघांमध्ये असताना देखील ओबीसी उमेदवाराला कधीही संधी मिळालेले नाही. प्रस्थापित राजकीय मंडळी ही सर्वसामान्य शेतकरी,कष्टकरी बांधवांना विविध आश्वासने देऊन झुलवत ठेवत त्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे हेतू साध्य केलेला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील बागायत शेतकरी त्याचप्रमाणे जिरायत शेती करणारा शेतकरी, कष्टकरी कामगार आणि बेरोजगार तरुण या तरुणांच्या आर्थिक विकासासाठी तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी कधीही प्रयत्न केलेला नाही. तीन लाख कोटी बजेट पैकी एक टक्का बजेट देखील या 60% ओबीसीसाठी या सत्ताधाऱ्यांनी खर्च केलेला नाही. प्रस्थापित नेत्याच्या शिवाय अन्य समाजातील उमेदवाराला न्याय मिळत नाही. त्याचप्रमाणे या ओबीसी प्रतिनिधीला संधी दिली जात नाही. ओबीसी समाजाचा आवाज संसदेमध्ये उठवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये 13 लाख हुन अधिक मतदार हे ओबीसी असून देखील या समाजातील कोणालाही खासदारकीची उमेदवारी दिली जात नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल. सध्याचे खासदार हे मिनिटाला, तासाला हजारो कोटी रुपये चा निधी आणला म्हणून सांगत फिरत आहे. परंतु माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये कुठे विकास झालेला आहे ते त्यांनी दाखवून द्यावे. शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. या भागातील प्रश्न देशाच्या पटलावर ती कधी मांडलेले पाहायला मिळत नाही. माढा लोकसभा मतदारसंघातील बेरोजगार तरुणांच्यासाठी एमआयडीसी त्याचप्रमाणे अन्य उद्योग धंदे सुरू करायला हवे होते. परंतु फक्त मत मागण्या पुरते या प्रस्थापित राजकीय नेत्यांनी पाच वर्षातून यायचा आणि मत मागून निवडून जायचे एवढेच कार्य त्यांनी केलेले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील येणारे तालुके सांगोला माळशिरस माढा करमाळा आदी तालुक्यामधून जास्तीत जास्त संख्येने हा ओबीसी समाज असून देखील या ओबीसी समाजातील मान्यवर आजी-माजी नेते मंडळींनी देखील कधी खासदारकी साठी उमेदवारी दाखल केली नाही. संसदेमध्ये त्यांनी या मतदार संघातील विविध विकासाची कामे व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे कधी त्यांना वाटले नाही.
माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा हमीभाव मिळवण्याचे प्रश्न लोकशाहीच्या दरबारामध्ये मांडण्यासाठी मला एक वेळ जनतेने संधी द्यावी.
या संधीचे सोने केल्याशिवाय मी राहणार नाही. असे लक्ष्मण हाके यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
माढा लोकसभा मतदार संघामधून मी माझी उमेदवारी बहुजन पार्टीच्या वतीने जाहीर केलेली आहे. आता माघार नाही. प्रस्थापितांच्या विरोधात शेवटपर्यंत लढणार असे त्यांनी आपल्या पत्रकार परिषद मध्ये सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा