"दो हंसो का जोडा" म्हणून प्रसिद्ध असलेले विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांनी कधी कुणाचा पक्ष फोडला नाही....अमित देशमुख


 पंढरपूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दो हंसो का जोडा म्हणून ओळखले जाणारे विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे यांनी कधी कुणाचा पक्ष फोडला नाही, की कुणाचं घर फोडले नाही. ही संस्कृती काँग्रेसची आहे. आज महाराष्ट्रामध्ये भाजपा या पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून आज विधानसभेमध्ये हे भाजप नेते म्हणतात की ही शिवसेना  एकनाथ शिंदेंची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची परंतु आज शरद पवारांचे घर फोडून आज विधानसभेमध्ये हे भाजप नेते म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार ची अशी ही पक्ष फोडणारे आणि घर फोडणारी भाजपा संस्कृती आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने संस्कृती जपली. कोणाचा पक्ष फोडला नाही की घर फोडले नाही. जनतेने जो दिलेला कौल आहे. तो मान्य करून जनतेच्या कौला चा मान ठेवून त्यांनी आपली संस्कृती जपली. परंतु आता अशी संस्कृती महाराष्ट्रामध्ये तसेच देशामध्ये दिसून येत नाही. अशी खंत आमदार अमित देशमुख यांनी आज व्यक्त केले. 

    सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी पंढरपूर तालुक्यांमध्ये आले असता कासेगाव या गावी  आपल्या प्रचार सभेमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

      काँग्रेस सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असते, गोरगरीब ,कष्टकरी, कामगार, बेरोजगार तरुणांची सरकार असते. या भाजप सरकारने शेतकऱ्यांची पिकाला हमीभाव देतो म्हणाले परंतु तो त्यांनी शब्द पाळला नाही. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देतो म्हणाले, परंतु बेरोजगारांना काम दिले नाही. समाजामध्ये अन्याय अत्याचार हा महिलांवर वाढलेला आहे. तो त्यांनी कमी केलेला नाही. जाती जातीत धर्माधर्मात द्वैष निर्माण करण्याचे काम या सरकारने केले आहे. अशा या सरकारला पराभूत करण्याची वेळ आज आलेली आहे. 

    सुशील कुमार शिंदे ज्यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहिले होते. त्यावेळी कासेगाव या गावातून त्यांना हजारोंच्या संख्येने मतदान झाले होते. असेच हजारोंच्या संख्येने मतदान आज या ग्रामस्थांनी प्रणिती ताई शिंदे यांना करावे. असे आव्हान देखील त्यांनी आज रोजी केले.

     आज देशांमध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये लोक एका दबावाखाली वावरत आहेत. जगत आहेत. या दबावाखाली सर्व जनता त्रस्त होऊन गेलेली आहे. लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्य असते. मग ते स्वातंत्र्य, आचार, विचार आणि भाषण शैली यांचे स्वातंत्र्य असते.आज असे आचार विचार स्वातंत्र्यावर बंधने येऊ पाहत आहे. आज लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर या एखाधिकारशाही असलेल्या आणि हुकूमशाही कडे वाटचाल करणाऱ्या भाजपा पक्षाला जनतेने दूर ठेवावे. आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांना भरघोस मतांनी जनतेने विजयी करावे. असे आव्हान अमित देशमुख यांनी आज आपल्या प्रचारार्थ सभेमध्ये कासेगाव या गावी केले. 

    यावेळी उपस्थित नेतेमंडळी सतेज पाटील, विश्वजीत कदम, भगीरथ भालके, अभिजीत पाटील असे असंख्य मान्यवर नेते मंडळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....