"नो कॅरिडाॅर.......नो डी.पी.प्लॅन" पंढरपूर येथील बाधीत होणाऱ्या भागातील महिलांचा प्रचंड विरोध
पंढरपूर ( प्रतिनिधी) गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चित असलेले महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र पंढरपूर या विठुरायाच्या नगरीमध्ये केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार हे पंढरपूर तीर्थक्षेत्र या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी म्हणून मोठे रस्ते तसेच विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वाराणसी तसेच उज्जैन या शहराच्या धर्तीवर हे कॅरिडॉर आराखडा राबवण्यात येणार असल्याचे शासन सांगत आहे.
या कॅरिडोरला व डीपी रस्त्यांना मंदिर परिसरातील हजारोच्या संख्येने राहणारे रहिवाशी, दुकानदार व मठाधिपती यांचा यांचा विरोध वेळोवेळी त्यांनी दर्शवलेला आहे. विरोध म्हणून त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे. तसेच लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन हे मतदान कॅरिडरच्या विरोधातील होते .असे विविध पद्धतीने निषेध व्यक्त करून देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कॅरीडोर आराखडा राबवीत आहे. याला विरोध दर्शवण्याच्या उद्देशाने आज पंढरपूर शहरातील मंदिर परिसरामधील भागात राहणाऱ्या शेकडो महिलांनी आज पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या कॅरिडॉरचा निषेध व्यक्त केला.
भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या डॉक्टर प्राजक्ता बेणारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी पाठवणार आहेत. या बहिणींचे म्हणणे ऐकून घ्यावे व ओवाळणी म्हणून हा कॅरिडॉर व डीपी प्लॅन रद्द करावा. अशी मागणी या बाधित होणाऱ्या भागातील महिलांनी आज रोजी या कॅरिडॉर व डीपी प्लॅनचा निषेध व्यक्त केला.
भाजपा या पक्षाच्या कमळ या चिन्हाला कायम मतदान करणारा हा मंदिर परिसरातील भाग आज कॅरिडॉर चा नावाखाली व डीपी प्लॅनच्या नावाखाली येथील सांस्कृतिक ठेवा, पुरातन वाडे व परंपरा या उद्धवस्त केला जातोय की काय असे वातावरण सध्या निर्माण झाले आहे.
पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने पंढरपूर शहरातील मंदिर परिसरामधील बाधित होणाऱ्या भागातील माता भगिनींनी उपस्थित राहून निषेध व्यक्त केला.

वाराणसी येथे कॉरेडोर झाले, पंढरपूर काय चीज आहे.मुठभर व्यापारी लोकांसाठी कॉरेडोर रद्द होत नसते.
उत्तर द्याहटवा