" कॅरीडोर बाधितांनी आता काळे झेंडे दाखवून उपयोग काय?"....
पंढरपूर ( प्रतिनिधी). नुकतेच पंढरपूर शहरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील संभाव्य बाधितांनी पंढरपूर येथे होणाऱ्या नवीन विकास आराखड्याला विरोध दर्शवण्याच्या उद्देशाने येत्या आषाढी यात्रेच्या वेळी दशमी ते एकादशी च्या दिवशी संपूर्ण मंदिर परिसरातील कॅरिडॉर बाधित भागामध्ये असलेले रहिवाशी व व्यापारी यांनी निषेध व्यक्त करण्याच्या उद्देशाने या परिसरातील दुकाने व घरे हे बंद ठेवली जाणार आहेत त्याचप्रमाणे काळे झेंडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवण्याची तयारी केली आहे असे असे संभाव्य बाधितांच्या वतीने बाबा महाराज बडवे महाजन यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर परिसरातील कॅरिडॉर बाधित व्यापारी व रहिवाशांना विश्वासात न घेतल्यामुळे नाराजी व्यक्त करीत त्यांनी दशक्रिया एकादशी या दिवशी मुख्यमंत्री हे महापूजेला येणार आहेत त्यावेळी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचे नियोजन केले आहे. यावेळी कॅरिडॉर बाधित असंख्य रहिवासी व व्यापारी वर्ग उपस्थित होते. गेल्या तीन-चार वर्षापासून "शिवाई "न्यूज पंढरपूर ...