" कॅरीडोर बाधितांनी आता काळे झेंडे दाखवून उपयोग काय?"....
पंढरपूर ( प्रतिनिधी). नुकतेच पंढरपूर शहरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील संभाव्य बाधितांनी पंढरपूर येथे होणाऱ्या नवीन विकास आराखड्याला विरोध दर्शवण्याच्या उद्देशाने येत्या आषाढी यात्रेच्या वेळी दशमी ते एकादशी च्या दिवशी संपूर्ण मंदिर परिसरातील कॅरिडॉर बाधित भागामध्ये असलेले रहिवाशी व व्यापारी यांनी निषेध व्यक्त करण्याच्या उद्देशाने या परिसरातील दुकाने व घरे हे बंद ठेवली जाणार आहेत त्याचप्रमाणे काळे झेंडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवण्याची तयारी केली आहे असे असे संभाव्य बाधितांच्या वतीने बाबा महाराज बडवे महाजन यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर परिसरातील कॅरिडॉर बाधित व्यापारी व रहिवाशांना विश्वासात न घेतल्यामुळे नाराजी व्यक्त करीत त्यांनी दशक्रिया एकादशी या दिवशी मुख्यमंत्री हे महापूजेला येणार आहेत त्यावेळी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचे नियोजन केले आहे. यावेळी कॅरिडॉर बाधित असंख्य रहिवासी व व्यापारी वर्ग उपस्थित होते.
गेल्या तीन-चार वर्षापासून "शिवाई "न्यूज पंढरपूर यामधून मंदिर परिसरातील या विकास आराखड्यामध्ये बाधित होणारे रहिवासी व व्यापारी वर्ग यांना सुचित करण्यात आले होते.जोपर्यंत या भागातील रहिवासी व दुकानदार यांनी आपली दुकाने व घरे हे यात्रेच्या या महत्वाच्या अष्टमी, नवमी,दशमी, एकादशी, द्वादशी असे चार-पाच दिवस आपापली दुकाने व घरे बंद ठेवून आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या मंत्रिमहोदयांचा निषेध व्यक्त करावा आणि आपले अडचणी, तसेच म्हणणे सरकार दरबारी मांडावे काळे झेंडे व फलक प्रत्येक घरावर तसेच दुकानावर लावून निषेध व्यक्त केला तरच सरकारचे व वारकरी संप्रदायाचे लक्ष वेधले जाईल असे सुचित केले होते. परंतु या परिसरातील व्यापाऱ्यांनी व रहिवाशांनी महाराष्ट्र शासन आपले म्हणणे ऐकून घेईल, आपल्याला विश्वासात घेईल अशा समजूतीमध्ये हे लोक राहिले आणि शेवटी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये कॅरीडॉर ही संकल्पना अमलात आणण्यासाठी चार हजार एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर झाले . पंढरपूर शहरांमध्ये कॅरीडोर होणार हे निश्चित झाले.आता या संभाव्य बाधितांनी आर या पारची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे परंतु आता वेळ निघून गेली असेच म्हणावे लागेल. पाहूया महाराष्ट्र शासन या संभाव्य बाधितांना विश्वासात घेते किंवा कसे.....

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा