" ज्या रस्त्यावर वहातुक जास्त तेच रस्ते डी.पी.रस्त्या अंतर्गत का नाही?.. हा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.


 पंढरपूर ( प्रतिनिधी). पंढरपूर तीर्थ विकास आराखडा अंतर्गत कॅरीडोर योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केली आहे. पंढरपूर शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकण्याच्या उद्देशाने त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन यांनी पंढरपूर शहरांमध्ये येणाऱ्या करोडोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांच्या साठी त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आणि त्यांचा पंढरपूर शहरातील मंदिर परिसरामधील वावर हा सुखकर व्हावा म्हणून कॅरिडॉर ही संकल्पना कार्यान्वित करण्याचे योजले आहे. यासाठी 4000 कोटी रुपये  शासनाने मंजूर केले आहेत.

   श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर  च्या आजूबाजू चा परिसर हा मोकळा करून भाविकांसाठी त्यांचा वावर या परिसरामध्ये सुटसुटीत व्हावा,मोकळा व्हावा त्यांना कुठलीही अडचणी येऊ नये म्हणून या परिसरामधील कित्येक घरे व दुकाने कॅरीडोर बाधित ठरवून त्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे शासनाने ठरवले आहे. या कॅरिडॉर सोबतच पंढरपूर शहराला जोडणारे त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात येणारे अंतर्गत रस्ते हे डीपी रस्त्या अंतर्गत मोठे करण्याचे नियोजन शासनाने योजले आहे. हे रस्ते 12 ते 18 मीटर या रुंदीचे असणार असून या डीपी रस्त्यांचे पंढरपूर शहरातील एकूण 22 भागातील हे 22 रस्ते डीपी रस्ता अंतर्गत येणार असून परंतु या 22 नियोजित डीपी रस्त्यामध्ये पंढरपूर शहरामध्ये जास्त  गर्दी व वाहतूक असलेला रस्ता म्हणजे पंढरपूर अर्बन बँक ते  छ.शिवाजी चौक  छ.शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक  हा रस्ता कायमस्वरूपी वाहतुकीने गजबजलेला असतो. हा रस्ता डीपी रस्त्या अंतर्गत घेतल्याचे आढळून येत नाही. त्याचप्रमाणे दुसरा रस्ता स्टेशन रोडला जोडून असलेला चप्पल लाईन म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता ते कृष्णाचा हौद व त्या पुढे जाणारा   हा रस्ता देखील कायमस्वरूपी गजबजलेला असतो वाहतुकीस अरुंद असा हा रस्ता dp रस्त्याच्या अंतर्गत न आल्याची दिसून येते हे दोन्ही गजबजलेले रस्ते शासनाने का गाळले? कशासाठी गाळले? अशी चर्चा संपूर्ण पंढरपूर शहरांमध्ये सध्या सुरू आहे. या डीपी  रस्त्यांच्या बाबतीत दुजाभाव केला जातो की काय? अशी देखील शंका पंढरपूर शहर वासी व्यक्त करीत आहे. या शंकेचे निरसन विकास आराखडा अधिकारी यांनी करावा अशी देखील मागणी लोक करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"