" भाजपा पक्षाला विधान परिषदे ची निवडणुक जिंकू की हरणार अशी शंका वाटू लागली "......
पंढरपूर ( प्रतिनिधी) जसजशी विधान परिषदेच्या निवडणुकी च्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तशी तशी राजकीय जाणकार तसेच मतदार आणि सर्वसामान्य कार्यकर्ते व नागरिक तर्कवितर्क करू लागले आहेत. भाजपा पक्षाचे मतदाराचे संख्याबळ मोठे असून देखील भाजपाचे पालकमंत्री जयकुमार यांना या निवडणुकीमधील मतदानाविषयी व मतदारांविषयी शंका वाटू लागली की काय असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामधून उपस्थित होऊ लागली आहे.त्यांनी नुकतेच म्हटले होते क्रॉस वोटिंग मला ओळखता येते आणि कोणी कोणाला मतदान केले हे देखील ओळखता येते असे म्हटल्यामुळे सर्वसामान्य जनता व जाणकार राजकीय व्यक्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणू लागले आहेत की, भाजपा पक्षाचे मतदारांच्या बद्दल भाजपाच्या नेत्या मंडळींना आपल्या विधान परिषदेच्या भाजपाच्या उमेदवाराला मतदान करतील की नाही? अशी शंका वाटू लागल्यामुळेच पालकमंत्री यांनी म्हटले असावे की मला क्रॉस वोटिंग ओळखता येते कोणी कोणाला मतदान केले हे ओळखता येते कारण या निवडणुकीसाठी मतदार म्हणून निवडून आलेले असंख्य सदस्य हे नवखे आहेत. त्यामुळे आपण केलेले मतदान हे वर...