" दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक सर्व सुविधा बाबत अग्रेसर..... आज मोबाईल बँकिंग ॲप व यूपीआय सेवेचा शुभारंभ " चेअरमन अमरजीत पाटील
पंढरपूर प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील नामांकित म्हणून ओळखली जाणारी व्यापारी बँक पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या बँकेने गेली 65 वर्ष सर्वसामान्य ग्राहक सभासद व्यापारी यांना अत्यंत उत्कृष्ट सेवा देण्याचे काम केलेले आहे. दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या बँकिंग क्षेत्रामध्ये नामलौकिक मिळवत सातत्याने अग्रेसर ठरलेली व असंख्य पुरस्कार प्राप्त असलेली पंढरपूर मर्चंट बँक या बँकेने आता सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अन्य बँकेच्या पेक्षा सर्व सुविधांनी युक्त अत्याधुनिक सेवा सुविधा देण्याचे काम केलेले आहे. दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक यांनी आपल्या ग्राहकांसाठी व सभासद खातेदारांसाठी मोबाईल बँकिंग ॲप यूपीआय अशा अनेक सुविधा ग्राहकांना मिळाव्यात म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच सहकार क्षेत्रातील या बँकेने ही सुविधा ग्राहकांसाठी व खातेदारांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आज या मोबाईल बँकिंगच्या ॲप व यूपीआय सुविधांचा शुभारंभ सोहळा आज पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या ठिकाणी शुभारंभ सोहळ...