"नदीकाठच्या शेतीपंपासाठी आठ तास वीज द्या..... सीना माढा उपसा सिंचन योजना त्वरित सुरू करावी.".... आमदार अभिजीत आबा पाटील
पंढरपूर ( प्रतिनिधी) आज महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनामध्ये माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सेना माढा उपसा सिंचन योजना ही त्वरित सुरू करून 169 तलावे भरावेत आणि त्याच प्रमाणे शेतकरी बांधवांना आपल्या शेतीच्या पंपासाठी आठ तास वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यांनी आपल्या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देऊन ही मागणी केली.
माढा तालुक्यामध्ये यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे उजनी धरणाच्या बोगद्यामधून सीना नदीत तात्काळ पाणी सोडण्यात यावे अशी महत्वपूर्ण मागणी करण्यात आली या दोन्ही मागण्यांची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले.
यानंतर आमदार अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन माढा तालुक्यातील पाणी प्रश्न बाबत सविस्तर चर्चा केली सीना माढा योजना सिंचन योजना स्वरूप कार्यान्वित करून 169 तलाव भरण्यात यावेत तसेच उजनी धरणातून सीना नदीत पाणी सोडण्यात बाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्याकडे केली या मागण्यांना सकारात्मक भूमिका घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच नदीकाठच्या शेतकरी बांधवांना आठ तास वीज ही उपलब्ध करून देण्यात यावी अशी देखील त्यांनी मागणी केली जिस पुरवठा अखंडित असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे आठवड्यात नुकसान होत आहे याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा