" पंढरपूर नगरपालिका अतिक्रमण विभाग कायमस्वरूपी कार्यरत राहणार की.... फिर वही दिल लाया हु "
पढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण देशभर ओळखले जाते पंढरपूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी श्री विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो करोडो च्या संख्येने भावीक भक्त दर्शनासाठी येत असतात. त्यांना मूलभूत सुविधा व सुख सोयी या मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र शासन पंढरपूर या ठिकाणी कॅरीडोर ची संकल्पना राबवत आहे. वाराणसी व उज्जैन या तीर्थस्थळाच्या धर्तीवर पंढरपूर शहराचे कॅरीडोरचे नियोजन असल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले आहे. त्यासाठी चार हजार 150 करोड रुपये शासनाने मंजूर केलेले आहे. मंदिर परिसरामध्ये होणारी दाटी वाटी आणि भाविक भक्तांना मार्गक्रमण करताना येणाऱ्या असंख्य अडचणी या जाणून घेऊन महाराष्ट्र शासनाने हा परिसर कॅरिडॉर च्या नावाखाली मोठा करण्यात येणार आहे. या परिसरातील शेकडोच्या संख्येने घरे दुकाने हे बाधित होणार आहेत.
मंदिर व अन्य ठिकाणी अतिक्रमणचे प्रमाण जास्त दिसून येते पंढरपूर शहरात प्रवेश करताच सर्वत्र अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठी असून देखील त्या फुटपाथवर अतिक्रमण केल्याचे दुकाने मांडण्याचे दिसून येत आहे हे पंढरपूर नगरपालिकेच्या नजरेस दर आषाढी वारी किंवा अन्य वारीच्या वेळी पडते. परंतु यंदा महाराष्ट्र शासनाने भाविकांची अडचण होऊ नये, त्यांचा मार्गक्रमण सुखकर व्हावा यासाठी अतिक्रमण हे पंढरपूर शहरात काढण्याचे आदेश दिल्यामुळे पंढरपूर नगरपालिका अतिक्रमण विभाग हे अतिक्रमण काढत असल्याचे सद्यस्थितीला दिसून येत आहे.
पंढरपूर शहर वासियांना या अतिक्रमण विभागाचे अनुभव दरवर्षीप्रमाणे येत आहे. यंदाच्या आषाढी पूर्वी पंढरपूर शहरातील अतिक्रमण काढण्याचे जोरदार मोहीम सुरू झाल्याचे दिसते हे अतिक्रमण फक्त वारीपुरतेच काढण्यात येणार आहे की कायमस्वरूपी हा अतिक्रमण विभाग सतर्क राहणार आहे? कार्यरत राहणार आहे?असा सवाल देखील पंढरपूर शहरातील लोक विचारू लागले आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर तसेच अर्बन बँक ते गजानन महाराज मठ रस्ता, आंबेडकर पुतळा ते शिवाजी चौक रस्ता या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण नेहमीप्रमाणे होत असल्याचे दिसून येते हे अतिक्रमण कायमस्वरूपी काढण्यात यावे अशी मागणी येथील रहिवाशी व भावीक भक्तांची देखील आहे.
पंढरपूर शहरातील प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाणारे कैकाडी महाराज मठ या परिसरामध्ये देखील मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. या परिसराला कडबे गल्ली व दाळे गल्ली म्हणून ओळखले जाते या परिसरातील रहिवासी घरांची रचना ही ब्रिटिशकालीन असून अतिशय सुटसुटीत व प्रशस्त रस्ते अशा प्रकारची रचना या भागांमध्ये पाहावयास मिळते. परंतु आजच्या स्थितीला या कडबे गल्ली व दाळ गल्ली या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घराच्या समोर, दुकानाच्या समोर स्थानिक रहिवाशांनी व दुकानदाराने अतिक्रमण केल्याचे दिसून येते याकडे पंढरपूर नगरपालिकेचे कायमस्वरूपी दुर्लक्ष असते असे या भागातील रहिवासी बोलत असतात. पंढरपूर नगरपालिका अतिक्रमण विभाग या भागातील अतिक्रमणाकडे लक्ष देणार की डोळे झाक करणार?असा सवाल देखील या परिसरातील रहिवासी करीत आहे.
पाहूया पंढरपूर नगरपालिका अतिक्रमण विभाग काय कार्य करते ते...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा