" मराठी पत्रकार संघ" पंढरपूर यांच्या वतीने पत्रकारांसाठी मोफत अपघाती विमा योजना " अधिक्षक डाक घर पंढरपूर विभाग पंढरपूर यांचे बहुमोल सहकार्य...



 पंढरपूर.( प्रतिनिधी). रोज बाबतीत अनिश्चितता आणि असुरक्षितता त्याचप्रमाणे तुटपुंजे मानधन यातच आपलं कुटुंब यांचा उदरनिर्वाह असे दे भर वर्षाचे जीवन लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणाऱ्या पत्रकारांची आहे हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही.

     बातम्यांच्या माध्यमातून सतत होणाऱ्या राजकीय सामाजिक घडामोडी कडे लक्ष देत बातमीचा शोध घेत आपले जीवनमान घोषित करणारे हे पत्रकार काही वेळा त्यांना संरक्षणाची देखील गरज भासते त्यांच्यावर असंख्य ठिकाणी हल्ले झालेले आहेत हे आपण दररोजच पाहत आहोत अशा पत्रकारांना येण्याचे कवच लाभावे म्हणून मराठी पत्रकार संघ यांचे संस्थापक अध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचीव हरिभाऊ प्रक्षाळे यांचा अथक प्रयत्नातून मराठी पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांना बजाज विमा कंपनीच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण हे डाकघर पंढरपूर विभाग यांच्या सहकार्याने सर्व पत्रकारांचे पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडून त्या माध्यमातून पोस्ट ऑफिस मधील विविध योजना या कशा व कोणत्या आहेत याचा लाभ सर्वसामान्य जनतेला व पत्रकार बंधूंना व्हावा म्हणून हा उपक्रम आज रोजी पंढरपूर पत्रकार संघाच्या स्थळी आयोजित करण्यात आला. यावेळी पंढरपूर डाक विभागाचे अध्यक्ष मुन्ना कुमार पोस्ट मास्तर सोमनाथ गायकवाड तसेच जागतिक मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कल्याण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती त्यासोबतच पंढरपूर डाग विभागाचे अन्य कर्मचारी हे देखील मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.

    पंढरपूर डाग विभागाचे पोस्टमास्टर सोमनाथ गायकवाड यांनी भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या विविध सेवा बचत व विमा योजना तसेच भारतीय डाक विभागामार्फत नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या डाग चौपाल उपक्रमांतर्गत उपलब्ध सुविधा आणि योजनाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

     पोस्ट खात्याच्या विविध लाभदायक योजनेची माहिती सोमनाथ गायकवाड यांनी दिली पत्रकारांना या माध्यमातून पोस्ट ऑफिस मधून बचत कशी करण्यात येते त्याचा लाभ दीर्घ काळानंतर कसा होतो याची माहिती देखील त्यांनी दिली अन्य बँकांच्या व्याजदरापेक्षा जास्तीचे व्याजदर हे पोस्ट ऑफिस देत असते अशी माहिती देखील त्यांनी दिली  

     या डाक चौपाल उपक्रमांतर्गत विविध योजना व लाभ यांचे मार्गदर्शन मराठी पत्रकार संघातील सर्व पत्रकारांना देण्यात आले यावेळी मराठी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार या कार्यक्रमास उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"