" डीपी रस्ता मध्ये जाणाऱ्या बाधितांना कॅरिडोर प्रमाणे नुकसान भरपाई मिळणार का?"...... पंढरपूर वासियांना पडलेला प्रश्न.
पंढरपूर ( प्रतिनिधी) नुकतीच पंढरपूर विकास आराखड्यामध्ये कॅरीडोर या संकल्पनेला चालना मिळणार असे नुकतेच जाहीर झालेले आहे हजारो कोटी रुपये खर्च करून पंढरपूर या ठिकाणी येणाऱ्या विठुरायांच्या भाविक भक्तांच्या सुख सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्याचप्रमाणे वारी कालावधीमध्ये होणारी अडचण ही आता या कॅरिडॉर च्या माध्यमातून दूर केली जाणार आहे.
कॅरिडॉर अंतर्गत येणाऱ्या असंख्य बाधितांना चाळीस हजार ते वीस हजार रुपये पर्यंतचा चौरस फुटाचा दर मिळणार असे चर्चा सध्या पंढरपूर शहरात सुरू आहे. कॅरीडोर बाधितांप्रमाणेच पंढरपूर शहरातील विविध भागातील रस्ते हे डीपी रस्त्याच्या अंतर्गत 12 ते 18 मीटर या रुंदीचे होणार असे जाहीर झालेले आहे पंढरपूर शहरातील एकूण 22 रस्ते जे रस्ते विठ्ठलाच्या मंदिराचे दिशेने येतील असे असून या रस्त्यामध्ये येणारे असंख्य इमारती घरे दुकाने हे बाधित होणार आहेत या बाधितांना महाराष्ट्र शासन नुकसान भरपाई म्हणून काय मोबदला देणार हे अद्यापही जाहीर झालेले नाही. ज्या लोकांची घरे इमारती दुकाने ही जाणार आहेत या सर्वांची चिंता आता वाढलेली आहे या डीपी रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या असंख्य लोकांच्या मध्ये चर्चा सुरू असून ज्याप्रमाणे मंदिर परिसरामधील कॅरिडॉर बाधितांना जो नुकसान भरपाईचा दर देण्यात येणार आहे तो दर आम्हा डीपी रस्ता बाधितांना मिळावा अशी चर्चा सध्या पंढरपूर शहरांमध्ये या 22 रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या रहिवाशा मधून व जनतेमधून चर्चा सुरू आहे.
कॅरिडॉर बाधितांना एक दर आणि डीपी रस्त्यात बाधित होणाऱ्या लोकांना दुसरा दर म्हणजेच कमी प्रमाणामध्ये नुकसान भरपाई मिळणार की काय अशी शंका देखील या होऊ पाहणाऱ्या बाबीतांच्या मनामध्ये येऊ लागली आहे. आता शासनापुढे कॅरिडॉर बाधितांप्रमाणेच डीपी रस्ता बाधितांना सामोरे जावे लागणार आहे. पाहूया या डीपी रस्ता बांधताना कॅरिडॉर प्रमाणे दर मिळतो किंवा कसे...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा