पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" साहेब...या रस्त्या वरुन ही येत जा"...

इमेज
 पंढरपूर( प्रतिनिधी). पंढरपूर नगरी हे तीर्थक्षेत्र संपूर्ण देशामध्ये वैकुंठ नगरी म्हणून ओळखले जाते या पंढरपूर शहरांमध्ये सर्वसामान्य वारकरी भाविक भक्तांच्या साठी त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याचप्रमाणे प्रशस्त असे रस्ते लाभावेत म्हणून आणि सर्वसामान्य वारकरी बांधवांना पंढरपूर शहरांमध्ये वावरताना गर्दी व चेंगराचेंगरी याचा अनुभव येऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने वाराणसी तसेच उज्जैन या तीर्थक्षेत्राच्या धरतीवर कॅरीडोर ही संकल्पना राबवण्याची ठरवलेले आहे त्यासाठी चार हजार एकशे पन्नास कोटी रुपये निधी देखील उपलब्ध झालेला आहे संपूर्ण शहरांमध्ये सुधारण्याचे व आधुनिकतेचे वारे वाहू लागले आहे भाविकांना व सर्वसामान्य रहिवाश्यांना याचा लाभ होणार हे खरे आहे परंतु ....     पंढरपूर शहरांमध्ये अधिक मासाच्या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. पंढरपूर शहरांमधील प्रमुख रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे, पंढरपूर नगरपालिका ते अर्बन बँक आणि अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता प्रचंड प्रमाणात वाहतुकीचा म्हणून ओळखला जातो या रस्त्याच्या ...

" कॅरीडॉर कुठून होणार कसा होणार याची माहिती जनतेला दिलीच पाहिजे नगरपालिकेने संपूर्ण शहरभर फ्लेक्स लावावा "...... शहरवासी

इमेज
 पंढरपूर.... प्रतिनिधी..      नुकताच महाराष्ट्र शासनाने पंढरपूर तीर्थक्षेत्र यासाठी भाविक भक्तांच्या साठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील वाहतूक ही सुरळीत व्हावी म्हणून आणि वारकरी संप्रदायातील येणाऱ्या असंख्य भाविकांना वारी कालावधीमध्ये तसेच अन्य कालावधीमध्ये  भाविक भक्तांना यात्रा कालावधीमध्ये  सुविधा उपलब्ध होवायात म्हणून त्यांच्यासाठी ही संकल्पना अमलात आणण्याचे नियोजन केलेले आहे त्यासाठी चार हजार 150 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहे.       पंढरपूर शहरांमधील रहिवाशी अद्यापही अनभिज्ञ आहेत करिडोर कुठून सुरू होणार, रस्ते कुठून मोठे होणार, शहरातील कुठल्या भागांमधील इमारती या जमीन दोस्त होणार याची काहीही माहिती पंढरपूर नगरपालिका तसेच महाराष्ट्र शासनाने दिलेली नाही.     पंढरपूर शहरातील असंख्य रहिवाशांना असे वाटते की पंढरपूर शहरातील असंख्य डीपी रस्ते हे मोठे होणार आहेत त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये कॅरिडॉर च्या नावाखाली असंख्यवाडे मठ मंदिर त्याचप्रमाणे दुकानदाराचे,रहिवाशांचे घरे हे जमीन दोस्त होणार आहेत. ...