" आमदार समाधान दादा अवताडे यांनी मागणी केली आणि ती त्वरित पूर्ण झाली " पावसाचे वाहून जाणारे पाणी म्हैसाळ योजनेला सोडले.....
पंढरपूर ( प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्याला अद्यापही पावसाने ओढ दिल्यामुळे या तालुक्यामध्ये व पंढरपूर तालुक्याच्या काही भागांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली असून यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आज रोजी कृष्णा पंचगंगा नदीचे पावसाचे बोराचे अतिरिक्त पाणी म्हैसाळ योजनेच्या कालव्यात सोडून मंगळवेढा तालुक्याचे जल संकट दूर करणे बाबत आमदार अवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन मागणी केली होती त्या मागणीची दखल घेऊन म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्याद्वारे सोडले असून याचा मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाला मोठा फायदा होणार आहे.
या निवेदनामध्ये आमदारा उतारे यांनी मागणी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की सध्या कृष्णा आणि पंचगंगा नदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून आगामी दिवसात पावसाचा जोर वाढल्यास सदर नदीपात्रात पूर महापौर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात तसेच माझ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अध्यापिक पावसाने ओढ दिल्यामुळे पेरणी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती अध्यापन आहे त्यामुळे या भागातील शेतकरी पाणी आणि पेरणी या दोन्हीपासून संकटात सापडला आहे दरम्यान सध्या कृष्णा आणि पंचगंगा नदीतील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी म्हैसाळ योजनेच्या वितरिका एक आणि दोन तसेच उमदी वितरिका लगत असलेल्या गावातील नागरिकांना पिण्याची तसेच शेतीसाठी दिल्यास या भागातील गावावर असलेले जल संकट टळेल. या भागातील कालवे कोरडे अवस्थेत असून कृष्णा व पंचगंगा नदीतील वाहून जाणारे पाणी या कालव्यात सोडल्यास मोठा दिलासा मिळेल असे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे अशी मागणी करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्वरित त्यांची मागणी पूर्ण केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा