पोस्ट्स

" वारकरी भक्तांच्या सुविधासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा "...... राजेंद्र आहेर

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या भावी भक्ता च्या सुविधासाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन दरबारी पंढरपूर शहरातील पत्रकारांनी आवाज उठवावा असे आवाहन जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी आज पंढरपूर येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पाचव्या महा अधिवेशनाच्या प्रसंगी बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.        पंढरपूर शहरामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोच्य संख्येने भाविक भक्त येत असतात. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गोपाळपूर या शहरापासून सात ते आठ किलोमीटर लांब अंतरावरून ऊन वारा पाऊस झेलत हे वारकरी भाविक भक्त दर्शनासाठी रांगेत येत असतात या वारकरी बांधवांच्या सुरक्षासाठी त्यांना ऊन वारा पाऊस यापासून बचाव करण्यासाठी कायमस्वरूपी या दर्शनबारीला पावसापासून व उन्हापासून सुरक्षा होण्यासाठी शेड मारण्यात यावे जेणेकरून पाऊस व उन्हापासून त्यांचा बचाव होईल तसेच पंढरपूर शहर आता विकास आराखड्यावर असल्यामुळे या ठिकाणी लाखो व कोटीच्या संख्येने भाविक भक्त येणार आहेत या ठिकाणी जे काही विकास कामे...

" पत्रकार कल्याण कुलकर्णी यांची जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड.... कुलकर्णी यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन ही संघटना वंचित पीडित व दुर्बल घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत असून मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ध्येयाने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. कल्याणराव कुलकर्णी यांच्या समाजसेवेला व संघटन  कौशल्याला आणखी बळ आणि कार्य विस्ताराला एक प्रकारे संधी मिळाली आहे  जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन या संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्या प्रित्यर्थ त्यांचे संपूर्ण जिल्हाभरामधून कौतुक व अभिनंदन याचा वर्षा होत आहे.      गेल्या पाच वर्षांमध्ये या संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रश्नावर आवाज उठवून जनतेच्या न्याय हक्कासाठी भरीव कार्य केले आहे संघटनेचे राष्ट्रीय राज्य विभागीय जिल्हा तालुका व शहर स्तरावरील पदाधिकारी सदस्य पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते मानवाधिकार क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून संघटनेचे जाळे अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.       जागतिक मानवाधिकार सुरक्षा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनी कल्याण कुलकर्ण...

" भाजपा पक्षाला विधान परिषदे ची निवडणुक जिंकू की हरणार अशी शंका वाटू लागली "......

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) जसजशी विधान परिषदेच्या निवडणुकी च्या  मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तशी तशी राजकीय जाणकार तसेच मतदार आणि सर्वसामान्य कार्यकर्ते व नागरिक तर्कवितर्क करू लागले आहेत. भाजपा पक्षाचे मतदाराचे संख्याबळ मोठे असून देखील भाजपाचे पालकमंत्री जयकुमार यांना या निवडणुकीमधील मतदानाविषयी व मतदारांविषयी शंका वाटू लागली की काय असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामधून उपस्थित होऊ लागली आहे.त्यांनी नुकतेच म्हटले होते क्रॉस वोटिंग मला ओळखता येते आणि कोणी कोणाला मतदान केले हे देखील ओळखता येते असे म्हटल्यामुळे सर्वसामान्य जनता व जाणकार राजकीय व्यक्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणू लागले आहेत की, भाजपा पक्षाचे मतदारांच्या बद्दल भाजपाच्या नेत्या मंडळींना आपल्या विधान परिषदेच्या भाजपाच्या उमेदवाराला मतदान करतील की नाही? अशी शंका वाटू लागल्यामुळेच पालकमंत्री यांनी म्हटले असावे की मला क्रॉस वोटिंग ओळखता येते कोणी कोणाला मतदान केले हे ओळखता येते कारण या निवडणुकीसाठी मतदार म्हणून निवडून आलेले असंख्य सदस्य हे नवखे आहेत. त्यामुळे आपण केलेले मतदान हे वर...

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

इमेज
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी ही सरसकट दिली जावी आणि कर्जमाफी बाबत असलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात यासाठी पंढरपूर येथील शिवतीर्थावर अन्न त्याग उपोषण सुरू केले होते. तीन ते चार दिवस चाललेले हे अन्य त्याग  उपोषण ठिकाणी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी या उपोषणाच्या स्थळी येऊन रोहित पवार यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत जाचक अटी रद्द करण्याच्या बाबतीत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. आणि आमदार रोहित पवार यांनी आपले अन्न त्याग  उपोषण सोडले.या वेळी  उपस्थित पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे भाजपाआमदार समाधान आवताडे तसेच विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे भाजपाचे मान्यवर नेते मंडळी यावेळी उपस्थित होते.      हे उपोषण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपाच्या काही वाचाळ वीरांनी या उपोषण स्थळी येऊन गोमूत्र शिंपडून जागा शुद्ध केल्याचे कार्य केले. याचा निषेध म्हणून पंढरपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर आबा भोसले, उद्योगपती नाग...

" राजकारणात काहीही घडू शकते "

इमेज
 पंढरपूर( प्रतिनिधी) प्रेमात आणि युद्धात अशक्य असे काही नसते त्याचप्रमाणे राजकारणात देखील काही घडू शकते अशी नवीन म्हण तयार होऊ पाहत आहे.     सध्या महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या एकूण 18 जागांपैकी 8 जागा बिनविरोध निवडून आले आहेत.  आता उर्वरित दहा जागेसाठी विधान परिषद च्या निवडणुका लागलेल्या आहे. भाजपा या पक्षाच्या व अन्य पक्षाच्या  युतीने या विधान परिषदेच्या जागा बिनविरोध निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न केले परंतु दहा जागेसाठी निवडणुका या लागलेल्या आहेत.     संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी भाजपा व अन्य पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट  तसेच अपक्ष अशा विविध पक्षाने आपापली उमेदवारी अर्ज भरले होते परंतु एकास एक अशी निवडणूक व्हावी म्हणून भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार मध्ये आता चुरशीची लढत होणार की काय असे लक्षणे दिसून येत आहे.     सोलापूर जिल्ह्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून ये...

" साहेब...या रस्त्या वरुन ही येत जा"...

इमेज
 पंढरपूर( प्रतिनिधी). पंढरपूर नगरी हे तीर्थक्षेत्र संपूर्ण देशामध्ये वैकुंठ नगरी म्हणून ओळखले जाते या पंढरपूर शहरांमध्ये सर्वसामान्य वारकरी भाविक भक्तांच्या साठी त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याचप्रमाणे प्रशस्त असे रस्ते लाभावेत म्हणून आणि सर्वसामान्य वारकरी बांधवांना पंढरपूर शहरांमध्ये वावरताना गर्दी व चेंगराचेंगरी याचा अनुभव येऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने वाराणसी तसेच उज्जैन या तीर्थक्षेत्राच्या धरतीवर कॅरीडोर ही संकल्पना राबवण्याची ठरवलेले आहे त्यासाठी चार हजार एकशे पन्नास कोटी रुपये निधी देखील उपलब्ध झालेला आहे संपूर्ण शहरांमध्ये सुधारण्याचे व आधुनिकतेचे वारे वाहू लागले आहे भाविकांना व सर्वसामान्य रहिवाश्यांना याचा लाभ होणार हे खरे आहे परंतु ....     पंढरपूर शहरांमध्ये अधिक मासाच्या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. पंढरपूर शहरांमधील प्रमुख रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे, पंढरपूर नगरपालिका ते अर्बन बँक आणि अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता प्रचंड प्रमाणात वाहतुकीचा म्हणून ओळखला जातो या रस्त्याच्या ...

" कॅरीडॉर कुठून होणार कसा होणार याची माहिती जनतेला दिलीच पाहिजे नगरपालिकेने संपूर्ण शहरभर फ्लेक्स लावावा "...... शहरवासी

इमेज
 पंढरपूर.... प्रतिनिधी..      नुकताच महाराष्ट्र शासनाने पंढरपूर तीर्थक्षेत्र यासाठी भाविक भक्तांच्या साठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील वाहतूक ही सुरळीत व्हावी म्हणून आणि वारकरी संप्रदायातील येणाऱ्या असंख्य भाविकांना वारी कालावधीमध्ये तसेच अन्य कालावधीमध्ये  भाविक भक्तांना यात्रा कालावधीमध्ये  सुविधा उपलब्ध होवायात म्हणून त्यांच्यासाठी ही संकल्पना अमलात आणण्याचे नियोजन केलेले आहे त्यासाठी चार हजार 150 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहे.       पंढरपूर शहरांमधील रहिवाशी अद्यापही अनभिज्ञ आहेत करिडोर कुठून सुरू होणार, रस्ते कुठून मोठे होणार, शहरातील कुठल्या भागांमधील इमारती या जमीन दोस्त होणार याची काहीही माहिती पंढरपूर नगरपालिका तसेच महाराष्ट्र शासनाने दिलेली नाही.     पंढरपूर शहरातील असंख्य रहिवाशांना असे वाटते की पंढरपूर शहरातील असंख्य डीपी रस्ते हे मोठे होणार आहेत त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये कॅरिडॉर च्या नावाखाली असंख्यवाडे मठ मंदिर त्याचप्रमाणे दुकानदाराचे,रहिवाशांचे घरे हे जमीन दोस्त होणार आहेत. ...