" वारकरी भक्तांच्या सुविधासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा "...... राजेंद्र आहेर


 पंढरपूर ( प्रतिनिधी) विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या भावी भक्ता च्या सुविधासाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन दरबारी पंढरपूर शहरातील पत्रकारांनी आवाज उठवावा असे आवाहन जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी आज पंढरपूर येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पाचव्या महा अधिवेशनाच्या प्रसंगी बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

       पंढरपूर शहरामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोच्य संख्येने भाविक भक्त येत असतात. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गोपाळपूर या शहरापासून सात ते आठ किलोमीटर लांब अंतरावरून ऊन वारा पाऊस झेलत हे वारकरी भाविक भक्त दर्शनासाठी रांगेत येत असतात या वारकरी बांधवांच्या सुरक्षासाठी त्यांना ऊन वारा पाऊस यापासून बचाव करण्यासाठी कायमस्वरूपी या दर्शनबारीला पावसापासून व उन्हापासून सुरक्षा होण्यासाठी शेड मारण्यात यावे जेणेकरून पाऊस व उन्हापासून त्यांचा बचाव होईल तसेच पंढरपूर शहर आता विकास आराखड्यावर असल्यामुळे या ठिकाणी लाखो व कोटीच्या संख्येने भाविक भक्त येणार आहेत या ठिकाणी जे काही विकास कामे होणार आहेत या विकास कामावर बारीक नजर ठेवून ही विकास कामे योग्य रीतीने होतात की नाही हे पाहण्याचे काम करावे व कुठे त्रुटी आढळून येत असतील भ्रष्टाचार आढळून येत असेल तर आपल्या प्रसार माध्यमातून व्यक्त व्हावे व सरकारला जागी करावे.

      कुठल्याही शासकीय अधिकारी किंवा आमदार खासदार व अन्य पदाधिकाऱ्यांचा ाजकीय पुढार्‍यांचा जर दबाव येत असेल तर फक्त एक फोन लावा जागतिक मानव सुरक्षा फेडरेशनची संपूर्ण टीम या पंढरपुरा शहरात येईल आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या पाठीशी उभे राहील याची ग्वाही त्यांनी आज या महा अधिवेशन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

      या महाधिवेशनास जागतिक मानवाधिकार सुरक्षा प्रदर्शन चे  पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष कल्याणराव कुलकर्णी, पंढरपूर शहर अध्यक्ष दत्ताजीराव पाटील, पंढरपूर तालुका अध्यक्ष बालम मुलानी,अपराजित सर्वगोड, विनोद पोतदार, कबीर देवकुळे, अमोल गुरव, वनसाळे, प्रकाश सरवळे, नागणे सर, नागेश सुतार, राजाभाऊ शहापूरकर, राजेंद्र काळे असे अनेक मान्यवर पत्रकार या महादिवेशनास उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"