" पत्रकार कल्याण कुलकर्णी यांची जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड.... कुलकर्णी यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव"
पंढरपूर ( प्रतिनिधी) जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन ही संघटना वंचित पीडित व दुर्बल घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत असून मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ध्येयाने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. कल्याणराव कुलकर्णी यांच्या समाजसेवेला व संघटन कौशल्याला आणखी बळ आणि कार्य विस्ताराला एक प्रकारे संधी मिळाली आहे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन या संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्या प्रित्यर्थ त्यांचे संपूर्ण जिल्हाभरामधून कौतुक व अभिनंदन याचा वर्षा होत आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये या संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रश्नावर आवाज उठवून जनतेच्या न्याय हक्कासाठी भरीव कार्य केले आहे संघटनेचे राष्ट्रीय राज्य विभागीय जिल्हा तालुका व शहर स्तरावरील पदाधिकारी सदस्य पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते मानवाधिकार क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून संघटनेचे जाळे अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जागतिक मानवाधिकार सुरक्षा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांनी कल्याण कुलकर्णी यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती जाहीर केली तसेच पंढरपूर तालुका अध्यक्षपदी बाल मुलाने आणि पंढरपूर शहर अध्यक्षपदी दत्ताजी पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडी प्रसंगी पत्रकार कल्याणराव कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त होत असताना ते म्हणाले जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे कार्य पुढे सुरू करण्याच्या उद्देशाने समाजामधील दुर्बल घटक वंचित घटक तसेच पीडित लोकांना न्याय व अधिकारासाठी या संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. कल्याण कुलकर्णी पुढे बोलत असताना ते म्हणाले या संघटनेच्या माध्यमातून आगामी काळात विविध सामाजिक जनजागृती व मानव अधिकार संरक्षणाची संबंधित उपक्रम राबवणार असल्याची त्यांनी माहिती यावेळी दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा