" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी ही सरसकट दिली जावी आणि कर्जमाफी बाबत असलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात यासाठी पंढरपूर येथील शिवतीर्थावर अन्न त्याग उपोषण सुरू केले होते. तीन ते चार दिवस चाललेले हे अन्य त्याग उपोषण ठिकाणी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी या उपोषणाच्या स्थळी येऊन रोहित पवार यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत जाचक अटी रद्द करण्याच्या बाबतीत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. आणि आमदार रोहित पवार यांनी आपले अन्न त्याग उपोषण सोडले.या वेळी उपस्थित पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे भाजपाआमदार समाधान आवताडे तसेच विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे भाजपाचे मान्यवर नेते मंडळी यावेळी उपस्थित होते.
हे उपोषण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपाच्या काही वाचाळ वीरांनी या उपोषण स्थळी येऊन गोमूत्र शिंपडून जागा शुद्ध केल्याचे कार्य केले. याचा निषेध म्हणून पंढरपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर आबा भोसले, उद्योगपती नागेश फाटे, दीपक वाडदेकर, युवराज भोसले, आदित्य फतेपुरकर व अन्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यावेळी आपल्या मनोगतामध्ये वरील नेतेमंडळी व्यक्त होत असताना त्यांनी दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविराचा जाहीर निषेध व्यक्त केला. भाजपामधील असे वाचाळ विरांची संख्या वाढत असल्यामुळे भाजपा या पक्षाची प्रतिमा ही मलिन होत आहे, याची देखील या वाचाविरांना जाणीव नाही. सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांच्या मागणीसाठी, शेतकऱ्यांचा हितासाठी त्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवार यांनी अन्नत्याग उपोषण केले परंतु स्वतःला शेतकरी म्हणवणाऱ्या या वाचाळविरांनी गोमूत्र शिंपडून तमाम शेतकरी बांधवांचा अपमान केला आहे. शेवटी शेतकरी बांधवाकडेच गोमुत्राची भीक मागायला हे वाचाळ वीरांना जावे लागले असा वाचाळीवरांचा जाहीर निषेध आज पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व आय काँग्रेस व अन्य मित्र पक्ष यांच्या वतीने आपल्या मनोगतात व्यक्त करण्यात आला.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा