" भाजपा पक्षाला विधान परिषदे ची निवडणुक जिंकू की हरणार अशी शंका वाटू लागली "......
पंढरपूर ( प्रतिनिधी) जसजशी विधान परिषदेच्या निवडणुकी च्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तशी तशी राजकीय जाणकार तसेच मतदार आणि सर्वसामान्य कार्यकर्ते व नागरिक तर्कवितर्क करू लागले आहेत. भाजपा पक्षाचे मतदाराचे संख्याबळ मोठे असून देखील भाजपाचे पालकमंत्री जयकुमार यांना या निवडणुकीमधील मतदानाविषयी व मतदारांविषयी शंका वाटू लागली की काय असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामधून उपस्थित होऊ लागली आहे.त्यांनी नुकतेच म्हटले होते क्रॉस वोटिंग मला ओळखता येते आणि कोणी कोणाला मतदान केले हे देखील ओळखता येते असे म्हटल्यामुळे सर्वसामान्य जनता व जाणकार राजकीय व्यक्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणू लागले आहेत की, भाजपा पक्षाचे मतदारांच्या बद्दल भाजपाच्या नेत्या मंडळींना आपल्या विधान परिषदेच्या भाजपाच्या उमेदवाराला मतदान करतील की नाही? अशी शंका वाटू लागल्यामुळेच पालकमंत्री यांनी म्हटले असावे की मला क्रॉस वोटिंग ओळखता येते कोणी कोणाला मतदान केले हे ओळखता येते कारण या निवडणुकीसाठी मतदार म्हणून निवडून आलेले असंख्य सदस्य हे नवखे आहेत. त्यामुळे आपण केलेले मतदान हे वरिष्ठांना ओळखू येऊ शकते की काय? अशी शंका या मतदारांच्या मनामध्ये येऊ लागली आहे याचाच अर्थ असा की भाजपाला आपल्याच पक्षाच्या मतदारांवर विश्वास आहे की नाही? अशी देखील शंका सर्वसामान्य जनता व ज्येष्ठ राजकीय नेते मंडळी व्यक्त करू लागले आहेत.
मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जाते. हे आज या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अधिकृत उमेदवारासाठी त्यांच्या विजयासाठी सक्रिय झाल्याचे चित्र दिसत असल्यामुळेच भाजपाच्या नेतेमंडळींना आपल्या पक्षाच्या मतदारांविषयी व पुर्वास्रमी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मध्ये असलेले कित्येक आजी-माजी आमदार हे मोहिते पाटील यांना मानणारे आहेत. त्यामुळे भाजपाच्या नेते मंडळींनी आपल्याच मतदारांवर अविश्वास व्यक्त करू लागली की काय?हे त्यांच्या नुकतीच केलेल वक्तव्य ते म्हणजे कोणी कोणाला मतदान केले ही आम्हाला समजू शकते या विधानावरून सर्वसामान्य मतदारांना व नागरिकांना वाटू लागले आहे...... पाहूया काय घडते ते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा