" साहेब...या रस्त्या वरुन ही येत जा"...


 पंढरपूर( प्रतिनिधी). पंढरपूर नगरी हे तीर्थक्षेत्र संपूर्ण देशामध्ये वैकुंठ नगरी म्हणून ओळखले जाते या पंढरपूर शहरांमध्ये सर्वसामान्य वारकरी भाविक भक्तांच्या साठी त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याचप्रमाणे प्रशस्त असे रस्ते लाभावेत म्हणून आणि सर्वसामान्य वारकरी बांधवांना पंढरपूर शहरांमध्ये वावरताना गर्दी व चेंगराचेंगरी याचा अनुभव येऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने वाराणसी तसेच उज्जैन या तीर्थक्षेत्राच्या धरतीवर कॅरीडोर ही संकल्पना राबवण्याची ठरवलेले आहे त्यासाठी चार हजार एकशे पन्नास कोटी रुपये निधी देखील उपलब्ध झालेला आहे संपूर्ण शहरांमध्ये सुधारण्याचे व आधुनिकतेचे वारे वाहू लागले आहे भाविकांना व सर्वसामान्य रहिवाश्यांना याचा लाभ होणार हे खरे आहे परंतु ....

    पंढरपूर शहरांमध्ये अधिक मासाच्या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. पंढरपूर शहरांमधील प्रमुख रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे, पंढरपूर नगरपालिका ते अर्बन बँक आणि अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता प्रचंड प्रमाणात वाहतुकीचा म्हणून ओळखला जातो या रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुकानदारांनी केलेले अतिक्रमण पंढरपूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या व तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेस कसे पडत नाही? हा प्रश्न सातत्याने सामान्य नागरिकांना पडतो आहे. मध्यंतरी पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार या रस्त्याने पंढरपूर नगरपालिकेकडे येत असता या गर्दीचा व अतिक्रमणाचा त्रास झाल्याचा दिसून आला, त्यावेळी पंढरपूर नगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तत्परतेने कामाला लागले आणि वाहतूक सुरळीत करू लागले परंतु आजच्या स्थितीला पुन्हा याच रस्त्यावरून स्थानिक दुकानदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या दुकानाच्या समोर अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होतो आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच आजारी पेशंट वयोवृद्ध तसेच लहान बालके महिला यांना या गर्दीतून वाट काढत काढत पुढे जावे लागते. अशी परिस्थिती या भागांमध्ये सातत्याने दिसून येते परंतु पंढरपूर नगरपालिका चे कर्मचारी व मुख्याधिकारी साहेब या रस्त्यावरूनच येतात यांना हे अतिक्रमण दिसत नाही की काय?असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो म्हणून कित्येक नागरिक आज म्हणत आहेत." साहेब या रस्त्याने देखील आपली गाडी घेऊन येत जा"

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"

"डॉ प्रणिता ताई भालके यांच्या रेकॉर्ड ब्रेक प्रचार शुभारंभा मुळे विरोधकांच्या ह्रदयाची धकधक वाढली "