" भीमा साखर कारखान्याच्या सभासदांना व कामगारांना गोड भेट " . सभासदांच्या हिताला प्राधान्य.... चेअरमन विश्वराज धनंजय महाडिक


 पंढरपूर....... भीमा सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या प्रगतीला तसेच सभासद व कामगारांच्या हिताला प्राधान्य देत भीमा सहकारी साखर कारखान्याचा कारभार सुरू असून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमतः साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक सभासद व कामगारांना साखरेची गोड भेट देण्याची नियोजन चेअरमन विश्वराज महाडिक यांनी केले आहे.

.    वीस रुपये किलोने 30 किलो साखर देण्याचे नियोजन केले आहे त्याचप्रमाणे पाच किलो साखर ही मोफत देणार नियोजन देखील केले आहे. यंदाची दिवाळी सर्व सभासद व कामगारांना गोड होण्याच्या उद्देशाने साखर वाटपाचे नियोजन केले आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना दहा किलो साखर मोफत देण्याचे जाहीर केले आहे.

.     भीमा सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांसाठी साखर वाटपाची वेळापत्रक दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये संबंधित गट ऑफिसवर सभासदांना साखरेची वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज धनंजय महाडिक यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

" निवडणूक पूर्वी डॉ. बीपी रोंगे यांच्या प्रचाराची फेरी पूर्ण "...... . अन्य उमेदवार अद्यापही निष्क्रिय....

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"