" शिक्षक आमदार पदाचा अनुभव दत्तात्रय सावंत यांना कामाला येणार "


 पंढरपूर........

.   महाराष्ट्र राज्याच्या शिक्षक विधानपरिषद आमदाराच्या निवडणुकीमध्ये आत्ता रंगत वाढू लागल्याचे दिसून येत आहे. पुणे शिक्षक मतदार संघातील माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी पुन्हा एकदा शिक्षक आमदारकीच्या शर्यतीत उडी घेतली आहे.

.    एक पंचवार्षिक शिक्षक आमदार पदी पुणे शिक्षक मतदार संघातून दत्तात्रय सावंत यांनी शिक्षक शिक्षकेतर यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत शिक्षकांच्या असंख्य अडचणी व प्रश्न यांची त्याने सोडवणूक केलेली आहे काही समस्या व अडचणी या शिक्षक व शिक्षकेतर मतदारांचे राहिलेले असून या समस्या व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा त्यांनी तयारी सुरू केली आहे.

.   असंख्य शिक्षक शिक्षकेतर मतदार बंधू भगिनींच्या सहकार्याने त्यांनी आपला निवडणूक प्रचार शुभारंभ आज सुरू केलेला असून श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आणि आपल्या प्रचार कार्यास आरंभ केलेला आहे. दत्तात्रय सावंत यांच्या प्रचार रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर मतदार हे उपस्थित होते.

.    पुणे शिक्षक मतदार संघामधून पुणे सातारा सांगली सोलापूर हे जिल्हे येतात या सर्व जिल्ह्यांमधून दत्तात्रय सावंत यांनी यापूर्वी कार्य केलेले आहे त्याचप्रमाणे पुणे शिक्षक मतदार संघ हा त्यांचा मागील अनुभवाचा असा हा मतदार संघ असल्यामुळे यंदाची पुणे शिक्षक मतदार संघातील त्यांची ही उमेदवारी या पुणे शिक्षक मतदारसंघातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिचयाची आहे  मागील आमदारकीचा अनुभव त्याचप्रमाणे प्रचाराचा अनुभव हा दत्तात्रय सावंत यांच्या पाठीशी असल्यामुळे आपण कुठे कमी पडतो याची जाणीव दत्तात्रय सावंत यांना असल्यामुळे त्यांनी प्रचाराचा शुभारंभ करून संपूर्ण पुणे शिक्षक मतदार संघ पिंजून काढण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे त्याचप्रमाणे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या जुनी पेन्शन योजना व अन्य अडचणी समस्या या सोडवण्यासाठी त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे एक कामाचा माणूस म्हणून अशी ओळख दत्तात्रय सावंत यांचे असल्यामुळे दत्तात्रय सावंत यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"