" पत्रकार व्हायचंय का? मग जरूर या....."
पंढरपूर.......
. सध्या संपूर्ण देशभरामध्ये प्रसार माध्यमाचे महत्व वाढत असल्याचे दिसून येत आहे. वर्तमानपत्र म्हणजेच प्रिंट मीडिया त्याचप्रमाणे दृकश्राव्य माध्यम म्हणजे टीव्ही चॅनल आणि त्याचबरोबर मुक्त पत्रकारिता युट्युब पोर्टल अशी विविध पत्रकारितेमधील माध्यमे ही लोकप्रिय होत असताना सर्वत्र दिसत आहे या या प्रसारमाध्यमांच्याकडे तरुण वर्गाचा ओघ वाढत असल्याचे दिसून येत आहे.
. समाजामधील सर्व स्तरा मधील लोकांच्या घरोघरी पोचणारे टीवी चैनल माध्यम त्याचप्रमाणे वर्तमानपत्रे यामधून संपूर्ण जगभराची माहिती देशभरातील माहिती त्याचप्रमाणे शेत शिवार या परिसरातील माहिती व घडामोडी या आपल्याला घरबसल्या समजू शकते व आपण वाचन करु शकतो. या सर्व घडामोडीचे व बातम्यांचे संकलन व्हिडिओ शूटिंग त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील अग्रलेख बातम्या या आपल्याला वाचावास मिळतात व पहावयास मिळतात या पत्रकार माध्यमेतील ही सर्व वैशिष्ट्ये व त्याला कौशल्य शिकण्यासाठी आज तरुण वर्ग पुढे सरसावत आहे समाजातील उनिवा, समस्या या शासन दरबारी दाखवण्यासाठी असेच तळागाळापर्यंत ही माध्यमे पोहोचू शकतात. त्याचप्रमाणे शासन दरबारी आवाज उठवण्याचे माध्यम म्हणून या पत्रकारिता कडे पाहिले जाते.
. पत्रकारितेमधील विविध कला कौशल्य तरुण वर्गाला माहिती व्हावी म्हणून पंढरपूर येथे पत्रकार भवन या ठिकाणी दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हास्तरीय वृत्तलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
. ही कार्यशाळा रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी पंढरपूर येथील इंदिरा गांधी चौकातील पत्रकार भवन येथे पार पडणार आहे या संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी ही कार्यशाळा खुली राहणार आहे नवोदित पत्रकार तसेच पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा.
. कार्यशाळेत पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अंबादास लक्ष्मण भास्कर आणि अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बापू बाबासाहेब चंदनशिवे उपस्थित राहणार आहेत हे दोन्ही तज्ञ उपस्थित राहणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत.
. या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत व अन्य पत्रकार सदस्य मंडळी प्रवीण नागणे तानाजी जाधव नागेश सुतार सचिन कुलकर्णी असे अन्य मान्यवर पत्रकार महोदय उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाचा लाभ सर्व नवोदित पत्रकार यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा