" क्लार्क ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदा पर्यत अतुल म्हमाने यांची यशस्वी वाटचाल" .
पंढरपूर..... आपल्या कर्तव्याशी सदैव तत्पर आणि प्रामाणिक पणे वाहून घेणे हे ज्या व्यक्तीला जमले ती व्यक्ती कधीही आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही क्लार्क या पदापासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी या पदापर्यंत यशस्वीपणे वाटचाल करीत राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेचे सरव्यवस्थापक अतुल म्हमाने यांची नुकतेच रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतुल म्हमाने यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली.
. 1996 साली पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक या बँकेमध्ये क्लर्क या पदावर आपला कार्य आरंभ सुरू केला आणि बघता बघता अतुल म्हमाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदापर्यंत आपली यशस्वी वाटचाल ते करीत आले आहेत. त्यांच्या बँकिंग सेवा क्षेत्रातील कार्याचा लाभ पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक या संस्थेला आणि तेथील सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे.
. दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन राजेंद्र पवनलाल फडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी या सत्कार समारंभास व्हाईस चेअरमन आदित्य फतेपुरकर,नागेश काका भोसले, सोमनाथ डोंबे, सुधीर भोसले, अमरजीत पाटील, विजयकुमार परदेशी आणि व्यवस्थापक रमेश कुलकर्णी व अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती लाभलेले अतुल म्हमाने यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा