" मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट कॅरिडोर ला विरोध करणारे कोण?..... . कॅरिडॉर मंजूरी प्रस्तावाला स्थगिती......


 पंढरपूर..........

.       गेली काही वर्ष पंढरपूर शहरासाठी चर्चित असलेला विषय म्हणजे पंढरपूर कॅरीडोर. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना या ठिकाणी वावरताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असतो.या ठिकाणी अरुंद असा रस्ता व बोळ यामुळे गर्दीची दाटीवाटी होते. यावर उपचार म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील पंढरपूर शहरासाठीचे चित्र या कॅरीडोर च्या माध्यमातून साकार होणार आहे. महाराष्ट्र शासनाने 4000 कोटी रुपये चा निधी कॅरिडॉर मधील विकास कामासाठी व बाधित रहिवासी व दुकानदारांसाठी हा निधी वापरला जाणार आहे. असे शासनाने जाहीर केले या कॅरिडॉर साठी विविध निवेदा जाहीर झाल्या नकाशे तयार होऊ लागले बाधितांचे पुनर्वसन कुठे करायचे याचे देखील नियोजन शासनाने केले परंतु 1982 साली जो मास्टर प्लॅन झाला त्यामध्ये कित्येकांची घरे व दुकाने बाधित झाले या बाधितांना नाममात्र मोबदला मिळाला पुनर्वसन देखील अर्धवट झाले असे असल्यामुळे पुन्हा आपल्या दुकान व घर जाग्यावर विकास कामाच्या नावाखाली नांगर फिरणार असे या बाधितांना वाटत असल्यामुळे त्यांनी प्रचंड विरोधी दर्शवला आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने या बाधित लोकानी आपला विरुद्ध दर्शविला.

.     पंढरपूर नगरपालिकेवर शिंदे  शिवसेना  यांच्या नगराध्यक्ष डॉ. प्रणिती ताई भालके या असून त्यांचे गटाचे नगरसेवक हे संखेने अल्प असून त्याचप्रमाणे भाजपाचे परिचारक गटाचे नगरसेवकांची संख्या जास्तीचे असून देखील या दोन्हीही भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवक नगराध्यक्ष यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या कॅरिडॉर ड्रीम प्रोजेक्ट ला विरुद्ध दर्शवला आहे.

.    वरील या सर्व घडामोडी पाहता महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांची सत्ता असून देखील या सरकारचे पंढरपूर  शहरातील भाजपा व शिंदे गटाने या कॅरिडोरच्या प्रस्ताव मंजुरीला विरुद्ध दर्शवून हा प्रस्ताव स्थगित ठेवलेला आहे. पुढील बैठकीवेळी या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

.     पंढरपूर शहरातील भाजप व शिवसेना शिंदे गट या गटाची पंढरपूर नगरपालिकेवर सत्ता आहे असे असून देखील  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या पंढरपूर शहरासाठी होणाऱ्या ड्रीम प्रोजेक्ट ला आणि भाजपा सरकारला घरचाच आहेर मिळाला आहे अशी चर्चा संपूर्ण पंढरपूर शहरात व सोलापूर जिल्ह्यात होत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे हे आपल्या मुलाखतीमध्ये म्हणतात कॅरिडोर हा कसल्याही परिस्थितीत होणार असून असे ते ठासून सांगतात.

 महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देखील भाजपा व शिंदे शिवसेना गटाची सर्वत्र सत्ता असून देखील या कॅरिडॉर प्रकल्पाला विरोध दर्शवला जात आहे. याचा अर्थ भाजपा व शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्णयाशी सहमत नाहीत असाच दर्शवतो.

.   येत्या काही दिवसात पुन्हा एकदा पंढरपूर नगरपालिका च्या बैठकीमध्ये कॅरिडॉर बाबतचा प्रस्ताव हा पुन्हा एकदा ठेवला जाणार आहे त्यावेळी आज विरुद्ध दर्शवणारे हे शिंदे शिवसेना गटाचे नगरसेवक आणि भाजपाचे नगरसेवक पुन्हा एकदा विरोध दर्शवतात की वरिष्ठ नेत्यांकडून कान उघाडणी करून घेतात. हे पहावे लागेल.

.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"