" ग्राहकांच्या सेवेसाठी दि. पंढरपूर मर्चंट को. ऑप. बँक सदैव तत्पर "...... अतुल म्हमाने मुख्य कार्यकारी अधिकारी. . दिनांक 28 29 30 सप्टेंबर रोजी बँक सुविधा उपलब्ध
पंढरपूर.....
. सर्व राष्ट्रीयकृत बँकांमधील कर्मचारीचे न्याय हक्क मागणीसाठी दिनांक 28 29 30 सप्टेंबर रोजी सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे कामकाज संप कालावधीमध्ये बंद ठेवले जाणार असून या राष्ट्रीयकृत बँकांचे या कालावधीमध्ये बंद पुकारल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची कुचुंबना व अडचण टाळण्याच्या उद्देशाने व ग्राहकांना आर्थिक व्यवहार करता यावा व त्यांच्या दररोजच्या बँकिंग क्षेत्रातील कामकाजामध्ये कुठलाही अडथळा येऊ न देण्याच्या उद्देशाने दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक ही बँक दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत ग्राहकांच्या सेवेसाठी या बँकेच्या सर्व शाखाचे कामकाज सुरू राहणार असून त्याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांनी घ्यावा अशी माहिती दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक यांच्यावतीने चेअरमन राजेंद्र फडे व्हाईस चेअरमन आदित्य फतेपुरकर व संचालक मंडळ यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल म्हमाने यांनी दिली.
. दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँक या बँकेच्या सर्व शाखा मधून ठेवी, कर्ज,एटीएम सुविधा क्रेडिट कार्ड,मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग सुविधा तसेच अन्य ग्राहक सेवा या उपलब्ध असून त्याचा लाभ खातेदार व ग्राहकांनी घ्यावा अशी माहिती दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल म्हमाने यांनी दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा