" आदिवासी समाजाच्या लढ्याला प्रसिद्धीची गरज आहे "...... पत्रकार विजयकुमार कांबळे
पंढरपूर.....
. आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच योग्य ते व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधने जनजागृती करण्यासाठी त्याचप्रमाणे समाजा मध्ये संघटनात्मक जाणीव निर्माण करण्यासाठी प्रसिद्धीची आवश्यकता आहे त्याकरिता प्रसिद्धी विभागाची भूमिका ही प्रभावी राहणार आहे अध्यक्ष दत्ता सुरवसे यांच्या महा नेतृत्वाखाली तसेच डॉक्टर मनोहर कोळी यांच्या मार्गदर्शनातून मिळालेली ही जबाबदारी माझ्यासाठी महत्त्वाचे आहे असे पंढरपूर येथील कोळी समाजाचे अभ्यासू पत्रकार विजयकुमार कांबळे यांनी क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित संघर्ष समिती सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले.
. पत्रकार विजयकुमार कांबळे आपल्या मनोगतामध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले संघटनेची ताकद म्हणजे एकजूट आणि समाज हिताची भूमिका या भावनेतून सोलापूर जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक प्रमाणे आणि तितक्याच ताकतीने प्रचार आणि प्रसार करण्यावर भर असणार असून वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करणार आहे समाजाच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या संघर्षात अधिकाधिक समाज बांधवांनी एकत्र येऊन संघटनेच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील आदिवासी कोळी समाज बांधवांना त्यांनी केले.
. दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या नियुक्ती पत्रात विजयकुमार कांबळे यांच्यावर सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून महत्त्वाचे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. संघटनेच्या माध्यमातून आदिवासी कोळी महादेव,डोंगरी कोळी, मल्हार,टोकरी कोळी,कोळी ढोर तसेच जमातीच्या विविध प्रश्नांवर सुरू असलेल्या संघर्षाची माहिती समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी संघटनेच्या उपक्रमाचा प्रचार प्रसार करणे आणि समाजातील बांधवांना संघटित करण्याचा प्रयत्न करणे. अशी जबाबदारी प्रसिद्धी प्रमुखाच्या पदाकडून अपेक्षित आहे. अशी मनोभावना आदिवासी कोळी समाजातील जेष्ठ नेते मंडळींनी व मान्यवरांनी व्यक्त केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा