" अखेर पंढरपूर कॅरीडोर वर शिक्कामोर्तब " . लवकरच कामाला सुरुवात....


 पंढरपूर....

.        गेली तीन-चार वर्ष महाराष्ट्रातील आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये वारकरी बंधू-भगिनींना चार यात्रा कालावधीमध्ये  दाटीवाटीने या परिसरामध्ये वावरावे लागत होते याची नोंद घेत महाराष्ट्र सरकारने गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी पासून पंढरपूर शहरातील मंदिर परिसरात भागातील मालमत्ता व दुकाने हे ताब्यात घेऊन या परिसरातील जागेमध्ये भव्य असे विविध दालने उभी करण्यात येणार असून हा परिसर वारकरी बंधूभगिनींना वावरण्यासाठी मोकळी जागा निर्माण करून देऊन होणाऱ्या गर्दीला तसेच दाटीवाटीला आणि भविष्यकाळात घडणाऱ्या अन्य दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा मंदिर परिसर सुशोभित व भव्य दिव्य करण्याच्या उद्देशाने त्याचप्रमाणे चंद्रभागा कडेला असलेले घाट हे पुनर्बांधणी करून स्वच्छ चंद्रभागा करण्याचे नियोजन त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील कॅरिडॉर प्रमाणेच प्रदक्षिणामार्ग हा भव्य दिव्य करण्याचे नियोजन आणि मंदिराकडे जाणारे अन्य बारीक सारीक रस्ते हे डीपी रस्त्याच्या अंतर्गत आणून ते देखील मोठे करण्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाने ठरवलेले आहे. कॅरिडॉर साठी चार हजार एकशे कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहेत या निधीला अखेर आज रोजी मंजुरी मिळालेली आहे अशी माहिती महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे.

.      नुकत्याच झालेल्या आषाढी यात्रेच्या दरम्यान मध्ये मंदिर परिसर त्याचप्रमाणे चौफाळा, छत्रपती  शिवाजी महाराज चौक , संत गजानन महाराज मठ, अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन रोड या परिसरामध्ये आणि एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने गर्दी झाल्याचे चित्र दिसून आलेले आहे ही गर्दी पाहता वारकरी बांधव त्याचप्रमाणे स्थानिक रहिवाशी अशी चर्चा करीत होते की 2026 च्या आषाढी यात्रेला जर या परिसरामध्ये एवढी गर्दी होत असेल तर 2047 साली या परिसराची काय परिस्थिती असेल? अशी चर्चा वारकरी बांधवांनी स्थानिक रहिवासी करत असल्याचे दिसून आले आहे.

.    या कॅरिडॉर ची व्याप्ती वाढवावी लागणार की काय अशी शंका देखील स्थानिक रहिवासी व्यक्त करीत आहेत त्याचप्रमाणे पंढरपूर शहरांमध्ये असलेले बारीक-सारीक रस्ते, बोळ जे मंदिराच्या दिशेने जाणार आहेत ते डीपी रस्त्या अंतर्गत मोठे केले जाणार आहेत हे रस्ते लांबी रुंदी ने किती फुटाचे असणार आहेत याची माहिती अध्यापी लोकांना मिळालेली नाही. कॅरिडोर प्रमाणेच डीपी रस्ता बाधितांना आपल्या दुकाने व मालमत्तांना दर मिळावा अशी अपेक्षा डीपी रस्ता बाधित होणाऱ्या लोकांच्या मधून मागणी होत आहे.

.     पाहूया कॅरीडोर ची व्याप्ती वाढणार की?..... डीपी रस्ते मोठे होणार?.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"