" कर्मयोगी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरण निमित्त आरोग्य शिबिर आयोजित"..... युवा नेते प्रणव परिचारक
पंढरपूर...
पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते कर्मयोगी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने पंढरपूर तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील गावांमधून मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. दिनांक 11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमधून सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच तज्ञांकडून आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे यासाठी सोलापूर आणि पुणे येथील डॉक्टर उपस्थित राहतील या शिबिराच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून मोतीबिंदू मुक्त डोळस पंढरपूर तालुका करण्याच्या उद्देशाने हा संकल्प सोडलेला आहे अशी माहिती युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली.
. पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिवार युवा मंच पंढरपूर यांच्या वतीने हे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले असून शंकराव साळवे नेत्र रुग्णालय सोलापूर यांचे विशेष सहकार्यातून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून व मदतीने हे शिबिर घेतले जाणार आहेत. पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण गावे तुंगत गादेगाव खर्डी उंबरे पागे कासेगाव रोपळे पुळुज आणि करकम या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालय आणि 22 ऑगस्ट रोजी भाळवणी येथे आरोग्य तपासणी शिबिर होऊन समारोप होणार आहे.
. या शिबिरामध्ये नागरिकांची नेत्र तपासणी करून मोतीबिंद आढळल्यास पुढील मोफत शस्त्रक्रिया साठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे अद्यावत अशा सर्व उपचार रुग्णालयात रुग्णांना मोफत घेऊन शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे या सोबतच विविध आजारांचे मार्गदर्शन ही तज्ञ डॉक्टरांकडून केले जाणार आहे ग्रामीण भागातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आव्हान प्रणव परिचारक यांनी केले आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा